IND vs ENG 5th T20I Score : मुंबईत भारताने इंग्लंडला हरवले, मालिका 4-1 ने जिंकली, अभिषेकने घातला धुमाकूळ
IND vs ENG 5th T20I Match and Scorecard Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार गेला.

Background
India vs England 5th T20I : भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिका त्याच शैलीत सुरू झाली आणि त्याच पद्धतीने संपली. मालिका आधीच जिंकलेल्या टीम इंडियाने इंग्लंडला एकतर्फी सामन्यात 150 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. मुंबईत झालेल्या या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्मा विजयाचा स्टार ठरला, त्याने 135 धावांची विध्वंसक खेळी करत टीम इंडियाला 247 धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, संपूर्ण इंग्लिश संघ फक्त 97 धावांवर गारद झाला आणि यामध्येही अभिषेकने 2 विकेट घेत योगदान दिले.
IND vs ENG 5th T20I Score : मुंबईत भारताने इंग्लंडला हरवले, मालिका 4-1 ने जिंकली, अभिषेकने घातला धुमाकूळ
भारताने टी-20 मालिकेत इंग्लंडचा पराभव केला आहे. रविवारी झालेल्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने 150 धावांनी जिंकला. भारताने मालिका 4-1 अशी जिंकली आहे. अभिषेक शर्माने मुंबईत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. त्याने स्फोटक शतकाव्यतिरिक्त 2 विकेट्सही घेतल्या. या सामन्यात अभिषेकने अनेक विक्रम मोडले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या. यादरम्यान अभिषेकने 135 धावांची खेळी खेळली. शिवम दुबेने 30 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर गारद झाला. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली.
टीम इंडियासाठी अभिषेकची विक्रमी खेळी
अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याने फक्त 54 चेंडूंचा सामना करत 135 धावा केल्या. अभिषेकच्या खेळीत 7 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेने 13 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. अशाप्रकारे, भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 247 धावा केल्या. सलामीवीर संजू सॅमसन 16 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादवला फक्त 2 धावा करता आल्या.
इंग्लंड संघ फक्त 97 धावांवर ऑलआऊट
भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. इंग्लंडचा संघ 10.3 षटकांत फक्त 97 धावांवर ऑलआउट झाला. यादरम्यान, फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले. त्याने 23 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. सॉल्टने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. जेकब बेथेल 10 धावा करून बाद झाला. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, इतर कोणालाही दुहेरी अंकाचा टप्पा गाठता आला नाही.
IND vs ENG 5th T20I Live Score : अभिषेक शर्माच्या स्फोटक शतकामुळे टीम इंडियाने उभा केला 247 धावांचा डोंगर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 247 धावा केल्या. अशाप्रकारे, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघासमोर 248 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार शतकी खेळी केली. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 135 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 7 चौकार आणि 13 षटकार मारले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, भारतीय फलंदाज प्रथम फलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांनी धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच षटकात संजू सॅमसनने 16 धावा काढल्या. पण, यानंतर संजू सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतला, परंतु अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी सहज धावा काढत राहिल्या. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी वादळी पद्धतीने 115 धावांची भागीदारी केली.




















