एक्स्प्लोर

कुलदीपच्या चुकीचा फटका 'प्रिन्स'ला, शतकाजवळ जाऊन धावबाद, शुभमनला राग अनावर VIDEO 

गिल कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच रन आऊट झाला आहे. तसेच 2021 नंतर तो आता पुन्हा 91 धावांवर बाद झाला. शुभमन याआधी बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही 91 धावांवर बाद झाला होता.

Shubman Gill IND vs ENG: युवा फलंदाज शुभमन गिल राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात शतकापासून चुकला आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या शुभमन गिल दुसऱ्या डावात लयीत फलंदाजी करत होता. तो शतकाच्या जवळही पोहचला होता. पण कुलदीप यादवच्या चुकीमुळे शुभमन गिल धावबाद झाला. त्यामुळे त्याचं शतक हुकलं. धावबाद झाल्यानंतर शुभमन गिल याला राग अनावर आला. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल 91 धावांवर धावबाद झाला.  दुसऱ्यांदा शुभमन गिल नर्वस 90 चा शिकार झालाय. 

कुलदीपची चूक, फटका शुभमन गिलला - 

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही षटकं शिल्लक होती, त्यावेळी रजत पाटीदार बाद झाला. त्यामुळे कुलदीप यादव याला नाईट वॉचमन म्हणून बढती देण्यात आली. तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवनं आपलं काम चोख बजावलं. त्यांनंतर चौथ्या दिवशीही त्यानं लयीत फलंदाजी केली. शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये अर्धशथकी भागिदारीही झाली. पण मोठा फटका मारल्यानंतर कुलदीप यादव चेंडूकडेच पाहत राहिला, तोपर्यंत शुभमन गिल याने क्रीझ सोडलं होतं. इंग्लंडच्या फिल्डरने कोणतीही चूक केली नाही, चेंडू गोलंदाजाकडे टाकला. त्यामुळे शुभमन गिल धावबाद झाला. कुलदीप यादव याच्या चुकीमुळे शुभमन गिल याचं अर्धशतकं हुकलं. गिल कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच रन आऊट झाला आहे. तसेच 2021 नंतर तो आता पुन्हा 91 धावांवर बाद झाला. शुभमन याआधी बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही 91 धावांवर बाद झाला होता.

शुभमन गिलचं शतक 9 धावांनी हुकलं - 

विशाखापट्टनम कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक करत शुभमन गिल लयीत परतला होता. पण राजकोट कसोटीमध्ये तो शतकाजवळ पोहचला होता, पण त्याचं शतक 9 धावांनी हुकलं. शुभमन गिल यानं 98 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक ठोकलं. त्यानं हळूहळू शतकाकडे वाटचाल केली होती. पण 64 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला. कुलदीप यादव याने जोरदार फटका मारला, तो चेंडू बेन स्टोक्स यानं चपळाईनं अडवला. तोपर्यंत शुभमन गिलनं क्रिझ सोडलं होतं. बेन स्टोक्स यानं चपळाईनं चेंडू गोलंदाज हार्टलीकडे टाकला, अन् गिल धावबाद झाला. त्यावेळी शुभमन गिल 91 धावांवर खेळत होता. तो शतक करणार असेच सर्वांना वाटत होतं. पण त्याचं शतक हुकलं. शतक हुकल्यानंतर शुभमन गिल निराश दिला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget