एक्स्प्लोर

वीरेंद्र सेहवाग अरबी पोशाखामुळे ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप, नेमकं प्रकरण काय ?

Virender Sehwag Shoaib Akhtar Arabic Look : भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हजरजबाबी वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आक्रमक शैलीप्रमाणे स्पष्टोक्ती वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.

Virender Sehwag Shoaib Akhtar Arabic Look : भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हजरजबाबी वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आक्रमक शैलीप्रमाणे स्पष्टोक्ती वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. फक्त क्रिकेटच नाही तर इतर क्षेत्रातल्या घडामोडींवरही सेहवाग भाष्य करत असतो. पण आता वीरेंद्र सेहवाग वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. दुबईमध्ये एका सामन्यादरम्यान त्यानं केलेल्या पोषाखामुळे तो ट्रोल होतोय. वीरेंद्र सेहवाग याचा अरबी पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेहवागचा हा पेहराव अनेकांच्या पचनी पडला नाही. त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. 

ILT20 Final साठी दुबाईत पोहचला सेहवाग - 

ILT20 Final साठी वीरेंद्र सेहवाग शनिवारी दुबईत पोहचला होता. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर एमआय एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात त्याने समालोचन केलं. त्यावेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही त्याच्यासोबत होता. हे दोन्ही खेळाडू अरबी लूकमध्ये होते. दोघांनाही 'जुब्बा' घातला होता, जो इस्लामिक देशांमध्ये लोकप्रिय आहे. जे आयोजकांनी त्याला सामना सुरू होण्यापूर्वी घालायला लावले होते. याच पेहरावामुळे वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर ट्रोल होतोय. हा लूक शोएब अख्तर याला प्रचंड आवडलाय. त्यानं एक्सवर या हबीबी! ILT20 फायनलसाठी अरब फ्लेवरमध्ये तयार... असे लिहिलेय. 

सोशल मीडियावर चर्चेला उधाण -

मात्र, सोशल मीडियावर सेहवागच्या लूकवरून चर्चेला उधाण आले होते. सेहवागला इंडियाचे नाव बदलून 'भारत' करायचे होते. आज तो अरबी पोशाख परिधान करतो, असा खोचक टोला एका युजरने लगावला आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलेय की, ढोंगीपणा उघड! वीरेंद्र सेहवाग भारतीयांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीबद्दल व्याख्यान देतो आणि तो UAE मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत कॉमेंट्रीचा आनंद घेत आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget