IND vs ENG 2nd Test 5th Day : ना विराट, ना रोहित शर्मा, ना जसप्रीत बुमराह, शुभमन गिलच्या टीम इंडियाकडून एजबेस्टनवर विजयाचा झेंडा
IND vs ENG 2nd Test 5th Day : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 7 विकेट आवश्यक आहेत.
LIVE

Background
बर्मिंघम : दुसऱ्या कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस आज आहे. या दिवशी भारताला विजयासाठी 7 विकेटची गरज आहे. तर, इंग्लंडला विजयासाठी 536 धावांची गरज आहे. इंग्लंडला विजय मिळवायचा असल्यास त्यांना 90 ओव्हरमध्ये या धावा कराव्या लागतील. भारतानं चौथ्या दिवसाच्या तीन सत्रात वर्चस्व गाजवलं. इंग्लंड 3 बाद 72 पासून पुढे फलंदाजीला सुरुवात करेल. त्यांना मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा यांच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल.
आकाश दीपला सहावी विकेट, टीम इंडियाकडून एजबेस्टनचा बालेकिल्ला सर
आकाश दीपनं इंग्लंडच्या कार्सला बाद केलं, कार्सचा कॅच शुभमन गिलनं घेतला. भारतानं या विजयासह मालिकेत बरोबरी केली. भारतानं विदेशात सर्वात मोठा विजय मिळवला आहे. आकाश दीपनं दुसऱ्या डावात 6 विकेट घेतल्या. त्याला प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजानं साथ दिली.
इंग्लंडला नववा धक्का, टंग 2 धावांवर बाद, विजयापासून भारत एक पाऊल दूर
रवींद्र जडेजानं टंगला बाद करत विजयाच्या जवळ पोहोचवलं आहे. टंगचा कॅच मोहम्मद सिराजनं घेतला.




















