एक्स्प्लोर

India Vs England 2021: भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट, वनडे, टी-20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की या सामन्यादरम्यान प्रेक्षक स्टेडियममध्ये हजर राहणार नाहीत.

INDvsENG : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की या सामन्यादरम्यान प्रेक्षक स्टेडियममध्ये हजर राहणार नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा या खेळाडूंना स्वत: ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लवकरच चेन्नईला पोचणार आहे. त्यानंतर या संघाला एका आठवड्यासाठी क्वॉरंटाईन व्हाव लागणार आहे. यावेळी रणनीती बनवण्यास खेळाडूंना वेळ मिळेल. भारतीय संघाचा उत्साह सध्या जास्त आहे आणि आगामी मालिकेत त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. भारतीय संघ इंग्लंडला कमी लेखणार नाही आणि ऑस्ट्रेलियासारख्या चांगल्या रणनीतीवर काम करेल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.

कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात

पहिला सामना: 5-9 फेब्रुवारी (चेन्नई)

दुसरा सामना: 13-17 फेब्रुवारी (चेन्नई)

तिसरा सामना: 24-28 फेब्रुवारी (अहमदाबाद)

चौथा सामना: 4-8 मार्च (अहमदाबाद)

टी -20 मालिकेचे सर्व सामने अहमदाबादमध्ये

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी -20 मालिका देखील खेळणार आहे. सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. पहिला सामना 12 मार्च, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना 18 मार्च आणि शेवटचा सामना 20 मार्चला होईल. सध्या टी -20 साठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना: 23 मार्च (पुणे)

दुसरा सामना: 26 मार्च (पुणे)

तिसरा सामना: 28 मार्च (पुणे)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
Anjali Damania on Ajit Pawar : येवलेंचा अटकपूर्व जामीन कोर्टात जाऊन पोलिसांनी रद्द करुन आणावा
Rajan Patil on Ajit Pawar : अजित पवार आणि शरद पवारांचा आमच्या प्रगतीत मोठा वाटा,राजन पाटील म्हणाले..
Thackeray Bandhu Seat : ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केटचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केटचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
Embed widget