Eng vs Ind 1st Test Day-2 : पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
Jasprit Bumrah 3 wickets : दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने तिन्ही विकेट घेतल्या.

England vs India 1st Test Day 2 Update : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह एकामागून एक विकेट घेत होता. दुसरीकडे, इतर भारतीय गोलंदाज सतत संघर्ष करत होते. आता इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही असेच काहीसे दिसून आले. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने तिन्ही विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात ते अजूनही 262 धावांनी मागे आहेत. बुमराहच्या अचूक आणि धारदार माऱ्यामुळे इंग्लंडला सुरुवातीलाच हादरा बसला, मात्र नंतर बेन डकेट (62) आणि ओली पोपने (नाबाद 100) डाव सावरला. विशेष म्हणजे पोपने शतक झळकावून भारतीय गोलंदाजांची झोप उडवली आहे.
Stumps on Day 2 in Headingley!
— BCCI (@BCCI) June 21, 2025
England move to 209/3, trail by 262 runs.
3⃣ wickets so far for Jasprit Bumrah ⚡️
Join us tomorrow for Day 3 action 🏏
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/OcNi0x7KVW
लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 359/3 च्या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. शुभमन गिलने पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केले होते, तर ऋषभ पंतने दुसऱ्याच दिवशी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. यासह, पंत एमएस धोनीला मागे टाकत कसोटीत सर्वाधिक शतके करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. करुण नायर 8 वर्षांनी टीम इंडियात परतला आहे, पण तो खातेही उघडू शकला नाही.
📸🤸♂️
— BCCI (@BCCI) June 21, 2025
Ending Day 2 with a 𝙋𝙖𝙣𝙩-𝙖𝙨𝙩𝙞𝙘 celebration 🥳
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/LV0ipCyR1E
एकेकाळी भारतीय संघाने 3 विकेट्स गमावत 430 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर विकेट्सची माळ सुरू झाली आणि टीम इंडियाने पुढील 7 विकेट्स 41 धावांच्या आत गमावल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स व्यतिरिक्त, जोश टंगने आपल्या गोलंदाजीने कहर केला. स्टोक्स आणि टंगने दोघांनीही प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराह चमकला, बाकी मात्र फक्त पाहत राहिले...
भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 471 धावा केल्या. इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. झॅक क्रॉली फक्त 4 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर, बेन डकेट आणि ऑली पोप यांच्यात 122 धावांची अशी भागीदारी झाली की भारतीय गोलंदाज विकेटसाठी आसुसले. अखेर 28 व्या षटकात बुमराहने टीम इंडियाला ब्रेकथ्रू दिला, त्याने 62 धावांवर डकेटला क्लीन बोल्ड केले.
जसप्रीत बुमराहने आणखी 2 संधी निर्माण केल्या, परंतु यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांच्या चेंडूंवर प्रत्येकी एक झेल सोडला. प्रसिद्ध कृष्णा खूप महागडा ठरला, दुसरीकडे, मोहम्मद सिराजने काही संधी निर्माण केल्या, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. बुमराहने भारतीय संघासाठी तिन्ही विकेट घेतल्या.
THIRD wicket for #TeamIndia
— BCCI (@BCCI) June 21, 2025
THIRD wicket for Jasprit Bumrah 😎
Joe Root departs for 28.
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/RDpkFSx2EY
हे ही वाचा -





















