Eng vs Ind 1st Test Day-2 : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑली पोपने ठोकले शतक; बुमराहने घेतल्या तिन्ही विकेट, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
India vs England 1st Test Match Scorecard Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (20 जून)पासून लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर सुरू झाला आहे.
LIVE

Background
England vs India 1st Test Day 2 live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (20 जून)पासून लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर सुरू झाला आहे. शनिवारी (21 जून) या सामन्याचा दुसरा दिवस आहे. तेंडुलकर-आँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करत 2 गडी गमावून 359 धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिल 127* आणि ऋषभ पंत 65* धावांवर नाबाद आहेत.
पहिल्या दिवसाची हायलाईट्स :
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली आणि भारताला सॉलिड सुरुवात करून दिली.
- लंचपूर्वी राहुल 42 धावांवर बाद झाला, तर पदार्पण करणारा साई सुदर्शन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
- त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली.
- इंग्लंडकडून एकूण 5 गोलंदाज वापरण्यात आले.
- शोएब बशीर हा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 3.10 च्या इकॉनॉमीने मोजकेच धावा दिल्या.
- कर्णधार बेन स्टोक्सने 2 बळी घेतले, तर ब्रायडन कार्सला 1 विकेट मिळाली.
- पहिल्या दिवसावर भारताने आपली मोहोर उमटवली असून दुसऱ्या दिवशी गिल-पंत जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑली पोपने ठोकले शतक; बुमराहने घेतल्या तिन्ही विकेट, नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांवर संपला. ऑली पोपच्या शतक आणि बेन डकेटच्या अर्धशतकाच्या मदतीने इंग्लंडने पहिल्या डावात 49 षटकांत तीन गडी गमावून 209 धावा केल्या. भारताकडून बुमराहने तिन्ही विकेट घेतल्या.
ऑली पोपने 125 चेंडूत ठोकले शतक
ऑली पोपने 125 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पोपने चांगली फलंदाजी केली आणि शतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला. पोपने रूटसोबत अर्धशतकी भागीदारी देखील पूर्ण केली.




















