IND vs ENG 1st ODI: जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शामी (Mohammed Shami) यांची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर रोहित शर्मा- शिखर धवनच्या (Rohit Sharma- Shikhar Dhawan) सलामी जोडीनं आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1- 0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यादरम्यान एक अशी घटनाही घडली, जिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. भारताचा कर्णधार रोहित शर्मानं मारलेल्या षटकार स्टँडमध्ये बसलेल्या एका छोट्या चिमुकलीला लागला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 


नेमकं काय घडलं?
या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत इंग्लडला अवघ्या 110 धावांत गुंडाळलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानं 58 चेंडूत 76 धावांची भागेदारी केली. या खेळीदरम्यान त्यानं पाच षटकार आणि सहा चौकार मारले. मात्र, यापैकी एक षटकार स्टँडमध्ये बसलेल्या चिमुकलीला लागला. भारताच्या डावातील पाचव्या षटकादरम्यान ही घटना घडली. त्यावेळी मुलीच्या जवळच्या लोकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही सेकंदातचं इंग्लंडच्या फिजिओंनी संबंधित मुलीकडं धाव घेतली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला जास्त दुखापत झाली नसून ती पूर्णपणे बरी आहे. मारी साळवी असं त्या मुलीचं नाव असून ती 6 वर्षाची आहे.


 


व्हिडिओ- 






 


जसप्रीत बुमराहला सामनावीरीचा पुरस्कार
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघानं सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 



हे देखील वाचा-