Rohit Sharma Six Record : भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील (England vs India ODI Series) पहिल्याच सामन्यात भारताने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम खेळी करत देत नाबाद 76 धावा ठोकल्या. यावेळी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितने सामन्यात 5 षटकार ठोकले असून यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 षटकार पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत 231 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 49.00 च्या सरासरीनं आणि 89.25 च्या स्ट्राईक रेटनं 9 हजार 359 धावा केल्या आहेत. ज्यात 29 शतक आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी 264 धावा आहेत. या दरम्यान, त्याच्या बॅटीतून 250 षटकार तर 852 चौकार निघाले आहेत.
रोहितची आतापर्यंतची कारकिर्द
क्रिकेट | सामने | डाव | धावा | HS | सरासरी | BF | SR | 100s | 50s | 4s | 6s |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 45 | 77 | 3137 | 212 | 46.13 | 5625 | 55.76 | 8 | 14 | 335 | 64 |
एकदिवसीय | 231 | 224 | 9359 | 264 | 49.00 | 10486 | 89.25 | 29 | 45 | 852 | 250 |
टी-20 | 128 | 120 | 3379 | 118 | 32.18 | 2420 | 139.62 | 4 | 26 | 303 | 157 |
सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीनं त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 398 सामन्यात 351 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा क्रमांक लागतो. त्यानं 301 सामन्यात 331 षटकार मारले आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ सयसूर्याचंही नाव आहे. त्यानं 445 एकदिवसीय सामन्यात 270 षटकार मारले आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 1st ODI : जबरदस्त! आधी भेदक गोलंदाजी, मग संयमी फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय
- Mohammed Shami ODI Record : मोहम्मद शमीची कमाल, जलदगतीने 150 वन-डे विकेट पूर्ण करणाऱ्यां यादीत तिसऱ्या क्रमांकावर
- निवृत्तीनंतरही युवराज सिंहचा दबदबा, भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक; पाहा टॉप-5 फलंदाजांची यादी