Shikhar Dhawan On His Comeback : आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात सामने पार पडणार असून या सामन्यांना शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान बऱ्याच काळापासून संघाबाहेर असलेला शिखर आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघात परतला असून तो वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधार देखील असणार आहे, दरम्यान आपल्या कमबॅकबाबत बोलताना शिखरने त्याचा सर्व फोकस पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर (2023 ODI World Cup) असल्याचं सांगितलं.
'माझं लक्ष पुढील वर्षीच्या विश्वचषकावर'
शिखर धवनने त्याचं सध्या लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर असल्याचं सांगितलं. त्यासाठी मला जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत, असंही त्याने नमूद केलं. विश्वचषकापूर्वी अधिक सराव व्हावा यासाठी मला जास्तीत जास्त सामने खेळायचे असून सध्या मी चांगल्या फॉर्ममध्ये असून हाच फॉर्म कायम ठेवून विश्वचषकात संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे, असं तो म्हणाला.
शिखर धवन विश्वचषकांत 'HIT'
विश्वचषक किंवा आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये शिखर धवन दमदार फलंदाजी केली आहे. दरम्यान, 2013 आणि 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारतासाठी त्यानं सर्वाधिक धावा केल्या होत्या. याशिवाय, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये 2015 खेळल्या गेलेल्या विश्वचषकातही त्यानं चमकदाक कामगिरी केली होती. या विश्वचषकातही त्यानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. श्रीलंका दौऱ्यावर शिखन धवननं एकदिवसीय संघांचं नेतृत्व केलं होतं. आयपीएलनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतही त्याची संघात निवड झाली नव्हती. मात्र, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND, 1st ODI, Playing 11 : विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर संघात, कशी आहे भारताची अंतिम 11?
- ENG vs IND: एकदिवसीय मालिका जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक; तीन आक्रमक फलंदाजांचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन
- ENG vs IND, 1st ODI, Playing 11 : रोहित-गब्बर जोडी मैदानात उतरणार, कशी असेल भारताची अंतिम 11?