IND vs ENG,1st ODI : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 विकेट्सनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ज्यामुळे टी20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत एकदिवसीय मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी दाखवली. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. त्यानंतकर 111 धावांचं लक्ष्य केवळ 18.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केलं. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


IND vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकत भारताने सामना जिंकला. सामन्यात भारतीय गोलंदाजाकडून अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडलं. तर फलंदाजीतही रोहित, धवन जोडीने चमकदार कामगिरी केली.

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळी त्याने तब्बल 6 गडी तंबूत धाडले. तर त्यानंतर रोहितने 76 धावांनी नाबाद खेळी करत सामना भारताच्या नावे केला.

  3. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने सुरुवातीपासून इंग्लंडचे फलंदाज बाद करण्यात सुरुवात केली.

  4. इंग्लंडचे जागतिक क्रिकेटमधील आघाडीचे फलंदाज नवख्या खेळाडूंप्रमाणे बाद होताना दिसले.

  5. यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली.

  6. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या.

  7. 111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलााग करताना  रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शिखरने संयमी फलंदाजी केली.

  8. रोहितने 58 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर शिखरने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि केवळ 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला. 

  9. सामन्यातील अप्रतिम गोलंदाजीसाठी बुमराहला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात आलं.

  10. हा विजय मिळवत मालिकेत भारताने 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे.


हे देखील वाचा-