IND vs BAN Weather : शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती
IND vs BAN : एकदिवसीय मालिकेतील तीन पैकी दोन सामने गमावल्यानंतर आता तिसरा सामना भारत खेळणार आहे. मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे, पण अशामध्ये पाऊस व्यत्यय आणेल का? हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 10 डिसेंबरला होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता अखेरचा सामना भारताने गमावल्यास भारताला व्हाईट वॉश मिळू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारत करेल. हा वन डे सामना चट्टोग्राम येथे होणार असून सामन्यापूर्वी पाऊस या सामन्यात व्यत्यय ठरेल का? हा प्रश्न अनेकांसमोर असून यासाठी नेमकी हवामानाची स्थिती कशी आहे, पाहूया...
सामना होणाऱ्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमजवळील वातावरण उबदार आणि स्वच्छ असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढाकामध्ये पावसाची अजिबात शक्यता नाही. दुसरीकडे बुधवारी येथील तापमान 29 अंशांच्या आसपास राहू शकते. क्रिकेटच्या एका रोमहर्षक सामन्यासाठी तापमान अगदी योग्य आहे, असे समोर येत आहे.
कधी, कुठे होणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना उद्या अर्थात 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना बांगलादेशच्या झहूर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.
बांगलादेशचा संघ:
लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.