Sarfaraz Khan: भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू सरफराज खान (Sarfaraz Khan) याने इराणी ट्रॉफी स्पर्धेत शतक झळकावले आहे. मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात सामना कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने 97 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 57 धावा केल्या. डावाच्या सुरुवातीलाच मुंबईने झटपट विकेट्स गमावल्या. यावेळी सरफराज खान आणि अजिंक्य रहाणेने संघासाठी मोठी खेळी केली. सरफराज खान सध्या फलंदाजी करत असून त्याने 153 धावा केल्या आहेत. 


भारत आणि बांग्लादेश (Ind vs Ban) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. यावेळी सरफराज खानला (Sarfaraz Khan) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे दुसरा कसोटी सामना सुरु असताना चौथ्या दिवशी बीसीसीआयने सरफराज खानसह, ध्रुव जुरेल आणि यश दयालला संघातून वगळले होते. या खेळाडूंना इराणी ट्रॉफीच्या स्पर्धेत खेळता यावे, यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारत आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंना पाणी पुरवणाऱ्या सरफराज खानने इराणी चषकाच्या पहिल्याच सामन्यात मोठी खेळी करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सरफराज खानने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 14 अर्धशतक आणि 15 शतक झळकावले आहेत. 






सरफाराज खानचा भावाचा अपघात-


सरफराज खानचा भाऊ मुशीर खान याचा तीन दिवसांआधी भीषण अपघात झाला होता. कारने वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना भीषण अपघात झाला. यावेळी मुशीर खानची कार जवळपास तीन ते चारवेळा उलटली. या अपघातामुळे मुशीर खानला 3 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे मुशीर खान देखील इराणी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळणार होता. अपघातामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.


अजिंक्य रहाणेचे शतक हुकले- 


टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला अजिंक्य रहाणे आपले शतक पूर्ण करेल, असे वाटत होते, मात्र 97 धावांवर असताना यशद दयालच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने 234 चेंडूत 97 धावा करत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला.






संबंधित बातमी:


सरफराज खानच्या भावाचा भीषण अपघात; कार 4-5 वेळा उलटली, मुशीर खानसह वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु


Ind vs Ban: बांगलादेशला लोळवल्यानंतर रोहित शर्माला आली राहुल द्रविडची आठवण; गौतम गंभीरबाबतही स्पष्ट बोलला!