PM Narendra Modi नवी दिल्ली: नवी दिल्लीतील जमैका उच्चायुक्तालयासमोरील रस्ता आता 'जमैका मार्ग' म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली. यामुळे भारत आणि जमैकामधील संबंध आणखी चांगले होतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. 






जमैका रोडचे उद्घाटन जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांच्या हस्ते झाले. वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलही (Chris Gayle) यावेळी उद्घाटनाला उपस्थित होता. दरम्यान, नवी दिल्लीतील जमैकाचे उच्चायुक्त कार्यालय वसंत विहारमध्ये आहे आणि आता त्याच्या समोरचा रस्ता 'जमैका मार्ग' म्हणून ओळखला जाईल. भारत आणि जमैकाच्या पंतप्रधानांनी व्यापार, गुंतवणूक आणि शिक्षण आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली.






ख्रिस गेलने मानले होते नरेंद्र मोदींचे आभार-


भारतात 2019 च्या लोकसभा निवडणुकाजवळ आल्या असताना, ख्रिस गेल भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ निवडणूक रॅली काढणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही. पण 2021 मध्ये, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारताने जमैकाला लस पाठवली तेव्हा ख्रिस गेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते.


ख्रिस गेलची कारकीर्द-


ख्रिस गेलच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास नोव्हेंबर 2021 मध्ये वेस्ट इंडिजसाठी ख्रिस गेलने शेवटचा सामना खेळला होता, परंतु त्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. ख्रिस गेलने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. जमैकामध्ये आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर क्रिकेटला अलविदा म्हणायचे आहे, अशी भावना ख्रिस गेलने व्यक्त केली आहे. ख्रिस गेल शेवटचा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये खेळताना दिसला होता.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: बांगलादेशला लोळवल्यानंतर रोहित शर्माला आली राहुल द्रविडची आठवण; गौतम गंभीरबाबतही स्पष्ट बोलला!


Ind vs Ban: भारताने कसोटीत बाजी मारली, आता बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका रंगणार; वेळ, ठिकाण अन् सामने कुठे बघाल?, पाहा A टू Z माहिती