टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय
Bangladesh Team Squad: बांगलादेशने देखील टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.
Bangladesh Team Squad: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने काही दिवासांआधी एका कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला होता. आता बांगलादेशने देखील टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या (Ind vs Ban) कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. बोर्डाने नजमुल हुसैन शांतोला कर्णधार बनवले आहे. बांगलादेशने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. संघाने झाकीर अलीला संधी दिली आहे. तर शोरफुल इस्लामला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बांगलादेशने शाकिब अल हसन, लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांचाही संघात समावेश केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये होणार आहे.
Bangladesh Test Squad for the India Tour 2024#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/1npeXGgkix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 12, 2024
अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी-
बांगलादेशने अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. बांगलादेशने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजयाची नोंद केली होती. महमुदुल हसन, झाकीर हसन, शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक यांनाही संधी मिळाली आहे. मुशफिकुर रहीम हा देखील संघाचा एक भाग आहे. बांगलादेशने झाकीर अलीचा संघात समावेश केला आहे. त्याला अद्याप बांगलादेशकडून कसोटीत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण झाकीरचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. झाकीरने 49 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2862 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 19 अर्धशतके केली आहेत. झाकीरची प्रथम श्रेणी डावातील सर्वोत्तम धावसंख्या 172 धावा आहे.
बांगलादेशचा संपूर्ण संघ:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली आनिक
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.