एक्स्प्लोर

IND vs BAN 2nd ODI: दुखापतग्रस्त रोहितची एकाकी झुंज व्यर्थ, रोमहर्षक सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव; मालिकाही गमावली

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 

ट्वीट-

भारताचा पाच धावांनी पराभव
बांगलादेशनं दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात विराट कोहली आणि तिसऱ्या षटकात शिखर धवन बाद झाले. त्यानंतर भारताची धावसंख्या 39 असताना वॉशिंग्टन सुंदरच्या रुपानं संघाला तिसरा धक्का लागला. केएल राहुलही स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, श्रेयस अय्यरनं (82 धावा) आणि अक्षर पटेल (56 धावा) यांनी अर्धशतकीय खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु, 35 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यर मेहंदी हसनच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर 38 व्या षटकात अक्षर पटेलनंही आपली विकेट गमावली. फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झालेला कर्णधार रोहित शर्मा आठव्या विकेट्ससाठी मैदानात आला. त्यानं भारताला विजय मिळवून देण्यासाठी एकाकी झुंज दिली. परंतु, तो अपयशी ठरला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. बांगलादेशकडून हुसेननं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, मेहंदी हसन आणि शाकीब अल हसन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, मुस्ताफिजुर रहमान आणि महमुदुल्लाह यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली. 

मेहंदी हसनची महत्त्वपूर्ण खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात झाली. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजनं अनामुल हकला एलबीडब्लू करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पावर प्लेमध्ये बांगलादेशच्या संघानं दोन विकेट गमावून 44 धावा केल्या. उमरान मलिकनं त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात शांतोला क्लीन बोल्ड करून बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का दिला. सुंदर वॉशिंग्टन सुंदरनं शाकीब हल हसनला झेल बाद केलं. शाकीब अल हसनला 20 चेंडूत 8 धावा करत्या आल्या. बांगलादेशच्या डावातील 19 व्या षटकात वॉशिंग्टननं रहीम (12 धावा) आणि अफीफच्या (0 धाव) रुपात बांगलादेशच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. तर, उमरान मलिकनं महमूदुल्लाहला आऊट करून भारताला सातवं यश मिळवून दिलं. पण एका बाजूनं विकेट पडत असताना महेंदी हसननं  नाबाद 100 धावा) संघाचा डाव सावरला आणि बांगलादेशच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget