(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs BAN 1st Test Day 3: पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य
IND vs BAN 1st Test Day 3: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 512 धावांवर डाव घोषित केला.
IND vs BAN 1st Test Day 3: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 512 धावांवर डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात 404 धावांवर रोखल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. भारताला दुसऱ्या डावात 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात 258 धावांवर डाव घोषित केला. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे.
ट्वीट-
Innings Break!#TeamIndia declare the innings on 258/2, with a lead of 512 runs.@ShubmanGill (110) & @cheteshwar1 (102*) with fine centuries in the innings.
— BCCI (@BCCI) December 16, 2022
Scorecard - https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/BUsNecqD6O
भारताचा दुसरा डाव 513 धावांवर घोषित
दरम्यान, 254 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात दोन विकेट्स गमावून 258 धावा केल्या. भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल आणि शुभमन गिल सलामीसाठी मैदानात आले. पण यंदाही केएल राहुल (23 धावा) स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर शुभमन गिल (110 धावा) आणि चेतेश्वर पुजारानं (102 धावा) जबरदस्त फलंदाजी करत भारताची धावसंख्या 500 पार पोहचवण्यास मदत केली. बांगलादेशकडून मेहंदी हसन आणि खालीद अहमद यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
बांगलादेशचा पहिला डाव
भारताला 404 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं पहिल्याच चेंडूवर नजमूल शांतोच्या रुपात बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमेश यादवनं चौथ्या षटकात यासीर अलीची विकेट्स घेतली. लिटन दासही स्वस्तात माघारी परतला. बांगालादेशकडून मुशफिकूर रहीमनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. याशिवाय, शाकीब अल हसन (3 धावा), नुरुल हसन (16 धावा) आणि तैजूल इस्लाम शून्यावर बाद झाला. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्या दिवसाखेर 8 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात आलेला बांगलादेशच्या संघाला फक्त 17 धावा करता आल्या. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात बांगलादेशचा संघ 150 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, उमेश यादव आणि अक्षर पटेलच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
भारताचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. भारतानं 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या. यानंतर चेतेश्वर पुजारानं संघाचा डाव सावरला.त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली.भारताच्या डावातील 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला.त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. अखेरच्या सत्रात तैजूल इस्लामनं चेतेश्वर पुजाराला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आठव्या षटकातचं श्रेयस अय्यर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवनं संघाचा डाव सावरला. रविचंद्रन अश्विनं 58 तर, कुलदीप यादवनं 40 धावांचं योगदान दिलं. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून तैजूल इस्लाम आणि मेहंदी हसननं प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. तर, इबादत हुसेन आणि खालीद अहमदच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.
हे देखील वाचा-