एक्स्प्लोर

IND vs BAN : अटीतटीच्या सामन्यात भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव, मालिकेत बांगलादेशची 1-0 ची आघाडी

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत केवळ 186 धावा स्कोरबोर्डवर लावू शकला.ज्या बांगलादेशने 46 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून पूर्ण केल्या आणि सामना जिंकला.

IND vs BAN : कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात तसंच कॅच सुटल्यावर सामनाही हातातून निसटतो, याचा प्रत्यय आज भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आला. बांगलादेशने अवघ्या एका विकेटने सामना जिंकला. पण 9 विकेट गेले असताना बांगलादेशच्या फलंदाजांचा झेल भारताच्या केएल राहुलनं सोडला आणि हेच भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरले. सामन्यात आधी गोलंदाजी कर अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला बांगलादेशनं सर्वबाद केलं. स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) 5 विकेट्स घेतल्या, भारताकडून राहुलने 73 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीतही बांगलादेशने आधी चांगली कामगिरी केली पण 136 धावांवर त्यांचे 9 गडी बाद झाले असताना सामना ते जिंकतील असं वाटत होतं, पण तेव्हाच मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला.

नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली. सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावा करुन तंबूत परतला. श्रेयस आणि केएल यांनी काही काळ डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या 73 धावांच्या जोरावर भारत 186 धावांपर्यंत पोहचू शकला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. तर बांगलादेशकडून स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसन याने महत्त्वपूर्ण असे 5 विकेट्स घेत कमाल गोलंदाजी केली. ए. हुसेन यानेही तब्बल 4 विकेट्स घेतले, तर मेहिदी मिराजने एक गडी बाद केला.

187 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशने पहिल्या चेंडूवर विकेट गमावली. पण नंतर कर्णधार लिटन दासच्या 41 धावांच्या जोरावर त्यांनी डाव सावरला. दासला अनमूल (14) आणि शाकिब (29) यांची साथ मिळाली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत एक-एक करत बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. 39.3 ओव्हरमध्ये 136 धावांवर बांगलादेशचे 9 गडी तंबूत परतले. त्यानंतर भारत सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. पण तेव्हाच मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला. मेहदीनं नाबाद 38 आणि रेहमाननं नाबाद 10 धावा केल्या. विशेष म्हणजे मेहदी 15 धावांवर असताना तो झेलबाद होणार होता. पण केएल राहुलनं त्याचा सोपा झेल सोडला आणि सामना गमावण्यात हेच मोठं कारण ठरलं.  

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Latest Points Table: सगळ्या दिग्गजांचा अंदाज चुकवला, हलक्यात घेतलेले 2 संघ टॉपवर; पाहा IPL चे पॉइंट्स टेबल
सगळ्या दिग्गजांचा अंदाज चुकवला, हलक्यात घेतलेले 2 संघ टॉपवर; पाहा IPL चे पॉइंट्स टेबल
Yuzvendra Chahal And Tania Chatterjee: युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
युझवेंद्र चहलने व्हिडीओसह मेसेज पाठवले; अभिनेत्रीने ऑन कॅमेरा चॅट्स दाखवली, सोशल मीडियावर धुमाकूळ
Rohit Sharma-Virat Kohli Meet MI vs RCB IPL 2026: अरे मार ना...सामना सुरु होण्याआधी भेट; नंतर रोहित शर्मा-विराट कोहलीची टशन, काय घडलं?, VIDEO
अरे मार ना...सामना सुरु होण्याआधी भेट; नंतर रोहित शर्मा-विराट कोहलीची टशन, काय घडलं?, VIDEO
MI vs RCB IPL 2026 : मुंबईच्या वाड्यावर आरसीबीचं 'रॉयल'; हार्दिक पांड्याच्या एका चुकीने पलटणच्या पराभवाची 'हॅट्रिक', पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं
मुंबईच्या वाड्यावर आरसीबीचं 'रॉयल'; हार्दिक पांड्याच्या एका चुकीने पलटणच्या पराभवाची 'हॅट्रिक', पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Funeral: लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
Iran War Live Update: आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
Share Market Today: बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
Pandharpur Crime News: पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
Embed widget