एक्स्प्लोर

WTC Final वर ऑस्ट्रेलियाची पकड, कांगारुंकडे 296 धावांची आघाडी

IND vs AUS, WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे.

IND vs AUS, WTC Final 2023 : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे. रविंद्र जाडेजा याने दोन तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन 41 तर कॅमरुन ग्रीन 7 धावांवर खेळत होते. त्याआधी या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद 296 धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकरांनी झुंजार फलंदाजी करून टीम इंडियाची लाज राखली. त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचून भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवलं. अजिंक्य रहाणेनं 129 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह 89 धावांची, तर शार्दूल ठाकूरनं 109 चेंडूंत सहा चौकारांसह 51 धावांची खेळी उभारली.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला मोहम्मद सिराजने खिंडार पाडले. डेविड वॉर्नर याला अवघ्या एका धावेवर तंबूत पाठवले. त्यानंतर उमेश यादव याने उस्मान ख्वाजा याला 13 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. 24 धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन गडी तंबूत परतले होते. पण त्यानंतर स्मिथ आणि लाबूशेन या जोडीने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. अर्धशतकी भागिदारी करत टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. पण रविंद्र जाडेजा याने स्मिथला 34 धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर धोकादायक ट्रेविस हेड 18 धावांवर जाडेजाच्या गोलंदाजीवरच बाद झाला. सध्या मार्नस लाबुशेन आणि कॅमरुन ग्रीन मैदानावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची आघाडी आहे.

रहाणे-लॉर्डमुळे फॉलोऑन वाचला - 

अजिंक्य रहाणे आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर या मुंबईकर खेळाडूंच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने फॉलोऑन टाळलाय. अजिंक्य रहाणे याने 89 तर शार्दूल ठाकूर याने 51 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आला.  ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.  तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर बोलँड याने केएस भरत याला तंबूत पाठवत भारताच्या अडचणी वाढवल्या. भरत याला फक्त पाच धावांचे योगदान देता आले. भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट उभे ठाकले होते, त्यावेळी खडूस मुंबईकर धावून आले. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकर फलंदाजांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. पहिल्या सत्रात यांनी नाबाद 100 धावांची भागिदारी केली. पण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर रहाणेला बाद करत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. 

अजिंक्य रहाणे याने 129 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि 11 चौकार लगावले. तर शार्दूल ठाकूर याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. या जोडीने सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी केली. टीम इंडियाकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांनी 71 धावांची भागिदारी केली होती. आज रहाणे आणि शार्दूल यांनी शतकी भागिदारी करत फॉलोऑन टाळला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी  कोसळली. शार्दूल ठाकूर याने एकाबाजूने धावा जमवल्या, पण अर्धशतकानंतर तोही बाद झाला. उमेश यादव 5 आणि मोहम्मद शमी 13 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. नॅथन लायन याने एक विकेट घेतली. 

महत्त्वाच्या बातम्या

Harmanpreet Kaur Marathi News: हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुकवावी लागली!
हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावूक पोस्ट करत म्हणाली, मला अनेकदा वैयक्तिक पातळीवर किंमत चुकवावी लागली!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Team India Squad for Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर
भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा कर्णधार; कृणाल पांड्या-शशांक सिंहसह हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारताचा धडाकेबाज संघ जाहीर

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Rohit Pawar and Vikram Pachpute: पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Embed widget