Ind vs Aus 5th Test Live Streaming : भारत-ऑस्ट्रेलियाचा शेवटचा कसोटी सामना कधी, कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या सर्वकाही
टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे.
India vs Australia 5th Test Live Streaming : टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. या मालिकेत आतापर्यंत 4 सामने खेळले गेले असून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अंतिम आणि पाचवा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला मालिका बरोबरीत सोडवण्याची ही एकमेव संधी असेल. त्यामुळेच रोहित शर्मा आणि कंपनीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकला होता, जो पर्थ येथे खेळला गेला होता. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारूंनी 10 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. मेलबर्न येथे खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी जिंकला. आता पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत दोन्ही संघ आमनेसामने येतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवी कसोटी कधी होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना शुक्रवार 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना कोठे होणार आहे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनी येथे होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार पहाटे 4.40 वाजता होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना तुम्ही कुठे आणि कसा लाइव्ह पाहू शकाल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतात टीव्हीवर थेट पाहता येईल. याशिवाय मोबाईलवर सामना पाहणारे दर्शक डिस्ने हॉटस्टार ॲपवर ही कसोटी पाहू शकतात. तुम्हाला या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स https://marathi.abplive.com/sports या एबीपी वेबसाइटवर मिळू शकतील.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा -