एक्स्प्लोर

WTC Final : तिसऱ्या कसोटीत दमदार विजयाचा ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा, थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्री

IND vs AUS : इंदूर कसोटी सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवल्यावर ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या गुणतालिकेतील आपलं पहिलं स्थान आणखी भक्कम करत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.

WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात (IND vs AUS Test) सुरु कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पाहुण्या संघाने 9 गडी राखून जिंकला आहे. यामुळे मालिकेतील ऑस्ट्रेलियाचं आव्हान जिवंत असून विशेष म्हणजे त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC) च्या फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. गुणतालिकेत आधीपासून अव्वल स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने या विजयासह आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

सध्या या WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 68.52 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ सध्या 60.29 गुणांची टक्केवारी घेऊन दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामना तगड्या फरकाने जिंकल्यामुळे भारतही मजबूत स्थितीत असला तरी अद्याप भारताने WTC फायनलमध्ये एन्ट्री मिळवलेली नाही. अखेरचा सामना भारताने जिंकल्यास भारत सहज एन्ट्री मिळवेल. पण तसं न झाल्यास श्रीलंका जो तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यास भारताची WTC फायनलमधील एन्ट्री सोपी होईल.

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
 
संघ विजय पराभव अनिर्णीत एकूण गुण विजयी टक्केवारी
1. ऑस्ट्रेलिया 11 3 4 148 68.52
2. भारत 10 5 2 123 60.29
3.श्रीलंका 5 4 1 64 53.33
4. दक्षिण आफ्रीका 7 6 1 88 52.38
5. इंग्लंड 10 8 4 124 46.97
6. वेस्ट इंडीज 4 5 2 54 40.91
7. पाकिस्तान 4 6 4 64 38.10
8. न्यूझीलंड 2 6 3 36 27.27
9. बांगलादेश 1 1 10 16 11.11

भारताचा 9 विकेट्सने पराभव

तिसऱ्या कसोटीत भारतानं नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडल्यावर पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत दुसऱ्या डावातही 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला ज्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावांची गरज कांगारुंना विजयासाठी होती. तिसऱ्या दिवशी पहिल्या षटका एक विकेट गमावल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेन आणि हेड यांनी स्फोटक फलंदाजी करत सहज विजय संघाला मिळवून दिला.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget