एक्स्प्लोर

IND vs AUS, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून पार केलं 76 धावाचं लक्ष्य, सामन्यात दमदार विजयासह मालिकेतील आव्हान कायम

India vs Australia Indore Test: इंदूर कसोटीत भारताचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेल 76 धावाचं लक्ष्य त्यांनी सहज पार करत सामना 9 विकेट्सने जिंकला आहे.

IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. उत्कृष्ट गोलंदाजी तसच संयमी फलंदाजीच्या जोरावर कांगारुंनी हा सामना सहज जिंकत 9 विकेट्सनी भारताला मात दिली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील या विजयासह मालिकेतील ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम असून सद्यस्थिती भारत 2 विजय तर ऑस्ट्रेलिया 1 विजय अशी आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. पहिल्या डावात भारत केवळ 109 धावांत सर्वबाद झाला. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावाचं माफक लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने केवळ 1 विकेट गमावत ट्रेव्हिस हेडच्या नाबाद 49 आणि लाबुशेनच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर सामना जिंकला.

सामन्याचा लेखा-जोखा

सर्वात आधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं. ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109  धावांवर भारताचा डाव आटोपला. यावेळी मॅथ्यू कुहनेमनने फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. भारताकडून शुभमन गिल (21 धावा) आणि विराट कोहली (22 धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मग ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेनने डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं. पहिला दिवस संपताना जाडेजाने 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले होते. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियाने आक्रमक फलंदाजी सुरु केली 156 वर डाव सुरु केल्यावर 186 धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही. पण त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव या जोडीने दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि 186 वर पाचवी विकेट पडल्यावर 197 तर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 6 गडी केवळ 11 धावांमध्ये तंबूत परतले. 

9 गडी राखून ऑस्ट्रेलिया विजयी

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाल्यावर भारत एक मोठी धावसंख्या करुन ऑस्ट्रेलियाला तगडं लक्ष्य देईल असं वाटत होतं. पण पहिल्या डावाप्रमाणे यावेळीही भारताचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. केवळ टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 59 धावा केल्या. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान 163 इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. आता भारत आधीच 88 धावांच्या पिछाडीने खेळत असल्याने ऑस्ट्रेलियाला केवळ 76 धावाचं माफक लक्ष्य मिळालं. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताच पहिल्या षटकात भारताच्या आर अश्विनने उस्मान ख्वाजाला 0 धावांवर पहिल्याच षटकात बाद केलं. पण त्यानंतर ट्रेव्हिस हेड (नाबाद 49) आणि लाबुशेन (नाबाद 28) यांनी तुफान फटकेबाजी करत सहज 76 धावाचं लक्ष्य पार करत सामना 9 विकेट्सनी जिंकला.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget