एक्स्प्लोर

एकीकडं टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; दुसरीकडं 'पांडे'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

ICC T20 World Cup 2022: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी  काल 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

ICC T20 World Cup 2022: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी  काल 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करतान दिसणार आहे. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, याचदरम्यान कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेनं (Ishwar Pandey) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. टी20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर पांडेनं इंस्टाग्रामद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केलीय. 

ईश्वर पांडेला भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. दरम्यान, 2014 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, या दौऱ्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाकडून खेळण्याच्या प्रतिक्षेत असेलेल्या पांडेनं काल अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेताला. पांडेनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. 

ईश्वर पांडेनं इंस्टाग्राम पोस्ट- 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ishwar pandey (@ishwar22)

 

ईश्वरचंद पांडेनं इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय?
इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना ईश्वरचंद पांडेनं लिहिलंय की, “अखेर आज तो दिवस आला, मनावर दगड ठेवून मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय 2007 मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाय. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील होणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचंही दु:ख आहे."

ईश्वरचंद पांडेची कारकिर्द
ईश्वरचंद पांडेनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 75 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मध्य प्रदेशच्या संघाचं प्रतिनिधित्त्व केलंय. या 75 सामन्यांमध्ये त्याने 263 विकेट्स घेतल्या आहेत.तसेच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. आयपीएलमध्ये त्यानं 25 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं चेन्नईव्यतिरिक्त पुणे वॉरियर्स आणि रायझिंग सुपर जायंट्स संघाचंही प्रतिनिधित्व केलंय.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि आर अश्विन. स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आला, 2 चौकार ठोकले अन्... अचानक तंबूत परतला! दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं?
वैभव सूर्यवंशी आला, 2 चौकार ठोकले अन्... अचानक तंबूत परतला! दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं?
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : शुभमन गिलने जिंकली नाणेफेक; श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव OUT, टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
शुभमन गिलने जिंकली नाणेफेक; श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव OUT, टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
IND vs SL 2nd Test : दोन दिवस सुट्टी घेतली, सरावालाही आला नाही! आता गंभीर घेणार मोठा निर्णय; या धुरंधराचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट?
दोन दिवस सुट्टी घेतली, सरावालाही आला नाही! आता गंभीर घेणार मोठा निर्णय; या धुरंधराचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Embed widget