(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, 2nd T20I, Toss Update : अखेर दुसऱ्या टी20 सामन्याला होणार सुरुवात, नाणेफेक जिंकत टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IND vs AUS : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जात असून पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीराने सुरु होत आहे.
India vs Australia Toss Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना अखेर सुरु होत आहे. 7 वाजता सुरु होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आता 9.30 ला सुरु होत आहे. नुकताच भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना असून पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. दरम्यान पावसामुळे सामना उशीराने सुरु होत आहे, ज्यामुळे आता सामना प्रत्येकी संघ 8 ओव्हर्स फलंदाजी करु खेळणार आहेत.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against Australia in the second #INDvAUS T20I.
— BCCI (@BCCI) September 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/LyNJTtkxVv pic.twitter.com/aZnXCQCl4a
कसे आहेत दोन्ही संघ?
आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता भारताने एक मोठा बदल केला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अखेर मैदानात परतला आहे. उमेश यादवच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात उमेशला बऱ्याच काळानंतर संधी दिली होती, पण त्याला खास कामगिरी करता आली नाही. अखेर आज बुमराह परत संघात आला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने दोन बदल केले आहेत. नथन एलिस दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी डॅनियल सॅम्सला संधी देण्यात आली आहे.जोस इंगलिसच्या जागी सीन एबॉट खेळत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, डॅनियल सॅम्स.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. त्यात आजचा सामना विश्वचषकापूर्वी दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असल्याने या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा-