एक्स्प्लोर

IND vs AUS : पहिल्या टी20 सामन्यात भारत पराभूत, ऑस्ट्रेलिया 4 गडी राखून विजयी

IND vs AUS : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना खेळवला जात आहे. विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

LIVE

Key Events
IND vs AUS : पहिल्या टी20 सामन्यात भारत पराभूत, ऑस्ट्रेलिया 4 गडी राखून विजयी

Background

IND vs AUS, 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघासाठी आयसीसी टी20 विश्वचषकाआधी ही मालिका एक प्रकारे सराव सामने असणार आहेत. टी20 विश्वचषकापूर्वी होणाऱ्या या मालिकेतील आज पहिला सामना खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात असून नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सामना होणाऱ्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर ढगाळ वातावरण असणार आहे. वातावरणही 25 ते 27 अंश सेल्सियसमध्ये असणार असून वातावरणात 70 टक्के आर्द्रता असणार आहे. पावसाची शक्यता देखील असून 25 टक्के इतकी शक्यता असल्याने पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर 2018 पासून आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये सातवेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. ज्यामुळे आजही नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. 

या सामन्यासाठी दोन्ही संघानी आपआपले अंतिम 11 खेळाडू जाहीर केले आहेत. विश्वचषकात कोणाकोणाला संधी मिळणार? यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. असं असतानाही जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल, असं रोहितनं नाणेफेकीदरम्यान सांगितलं. तसंच ऋषभ पंत यालाही विश्रांती देत संघाबाहेर ठेवलं आहे. विशेष म्हणजे अनुभवी गोलंदाज उमेश यादव जवळपास 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्री टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. तसंच यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघात आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. 

22:32 PM (IST)  •  20 Sep 2022

ऑस्ट्रेलिया vs भारत: 19.1 Overs / AUS - 207/6 Runs

गोलंदाज : युजवेंद्र चहल | फलंदाज: टिम डेव्हिड OUT! टिम डेव्हिड झेलबाद!! युजवेंद्र चहलच्या चेंडूवर टिम डेव्हिड झेलबाद झाला!
22:30 PM (IST)  •  20 Sep 2022

ऑस्ट्रेलिया vs भारत: 18.6 Overs / AUS - 207/5 Runs

मॅथ्यू वेड चौकारासह 45 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत टिम डेव्हिड ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 1 चौकारासह 18 धावा केल्या आहेत.
22:29 PM (IST)  •  20 Sep 2022

ऑस्ट्रेलिया vs भारत: 18.5 Overs / AUS - 203/5 Runs

मॅथ्यू वेड चौकारासह 41 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत टिम डेव्हिड ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 1 चौकारासह 18 धावा केल्या आहेत.
22:28 PM (IST)  •  20 Sep 2022

ऑस्ट्रेलिया vs भारत: 18.4 Overs / AUS - 199/5 Runs

मॅथ्यू वेड चौकारासह 37 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत टिम डेव्हिड ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 1 चौकारासह 18 धावा केल्या आहेत.
22:28 PM (IST)  •  20 Sep 2022

ऑस्ट्रेलिया vs भारत: 18.3 Overs / AUS - 195/5 Runs

लेग बाय! यासोबतच ऑस्ट्रेलिया ची एकूण धावसंख्या 195 झाली.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget