(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात 'सर' जाडेजा मैदानात? दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर
IND vs ENG, Ravindra Jadeja : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जाडेजाच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
IND vs ENG, Ravindra Jadeja Injury Update : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात कसोटी मालिका (test Series) खेळवण्यात येत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा दिग्गज ऑलराऊंडर रविंद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रविंद्र जाडेजा सध्या दुखापतीतून सावरत आहे. जाडेजाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असलेला रवींद्र जडेजा सध्या बरे होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. मात्र, मिळालेल्या वृत्तानुसार, जाडेजा इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जडेजा संपूर्ण मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता
मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकू शकतो. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जाडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर बसू शकतो. कोणत्याही खेळाडूला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी साधारणपणे तीन ते आठ आठवडे लागतात. त्यामुळे जाडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Ravindra Jadeja, who picked up a hamstring injury during the first Test, is likely to be ruled out for the entire series 🤕#INDvsENG #BCCI #RavindraJadeja #TeamIndia #Cricket pic.twitter.com/m4ofo4L0jb
— InsideSport (@InsideSportIND) February 4, 2024
टीम इंडियाला मोठा धक्का
जाडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्या हे संघासाठी अडचणीचं ठरेल. जर जडेजा या कसोटी मालिकेतून बाहेर पडला तर भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असेल. जाडेजा हा स्टार अष्टपैलू असून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला स्टार ऑलराऊंडर खेळाडूची कमी भासेल.
पहिल्या कसोटीत अप्रतिम कामगिरी
जाडेजाने हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूंनी शानदार खेळी केली. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात जाडेजाने एकूण पाच विकेट घेतल्या होत्या. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने भारतासाठी 87 धावांचे मौल्यवान अर्धशतक झळकावलं. मात्र, तो भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. या चाचणीनंतरच जाडेजाला दुखापत झाली आणि त्याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसावं लागलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :