IND vs AUS : दुसऱ्या कसोटीत भारत बॅकफूटवर, टीम इंडियाला आणखी एक धक्का बसणार, ICC सिराजला शिक्षा देण्याची शक्यता, कारण...
Mohammad Siraj : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं मार्नस लाबुशेनला बॉल फेकून मारला. यामुळं त्याला आयसीसी शिक्षा करण्याची शक्यता आहे.
ॲडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून सुरु झाली आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारतासाठी फार फायदेशीर ठरला नाही. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल डावाच्या पहिल्याच बॉलवर बाद झाला. यानंतर भारतीय संघ 180 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 86 धावा केल्या. या दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असताना एक घटना घडली. आयसीसी त्या प्रकरणी मोहम्मद सिराजला शिक्षा करण्याची शक्यता आहे.
मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाच्या डावात 25 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्यावेळी स्ट्राइकवर मार्नस लाबुशेन होता. सिराज बॉल टाकण्यासाठी धावत आला, त्याचवेळी समोरच्या स्क्रीनच्या बाजूनं एक व्यक्ती बिअरचे ग्लास घेऊन निघाला होता, हे पाहिल्यानं लाबुशेनचं लक्ष विचलित झालं. इकडं सिराजनं रनअप पूर्ण केला होता, तो बॉल टाकण्यास तयार होता. सिराजला लाबुशेन विनाकारण बाजुला झाल्याचं वाटलं, अन् त्याला राग आला. सिराजनं लाबूशनेच्या दिशेनं बॉल फेकला, लाबुशेननं बॉलपासून स्वत:चं सरंक्षण केलं.
मोहम्मद सिराजच्या पुढच्याच बॉलवर मार्नस लाबुशेननं चौकार मारला. मोहम्मद सिराजला आयसीसीकडून या प्रकरणी शिक्षा होऊ शकते. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलं.
ॲडिलेडमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटीच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात निराशाजनक झाली. यशस्वी जयस्वाल गोल्डन डक झाला. त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलनं डाव सावरला. मात्र, मिशेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्यापुढं भारतीय फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव 180 धावांवर संपला. भारताकडून नितीशकुमार रेड्डीनं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर,विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत हे खेळाडू मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. केएल राहुलनं 37, शुभमन गिलनं 31, रिषभ पंतनं 21 आणि रविचंद्रन अश्विननं 22 धावा केल्या.
मिशेल स्टार्कनं भारताच्या सहा विकेट घेतल्या. त्याला पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेत साथ दिली.यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 1 बाद 86 धावा केल्या.
• Man runs behind the sight screen with a beer snake
— 7Cricket (@7Cricket) December 6, 2024
• Marnus pulls away while Siraj is running in
• Siraj is not happy
All happening at Adelaide Oval 🫣 #AUSvIND pic.twitter.com/gRburjYhHg
इतर बातम्या :