Rohit Sharma : रोहित शर्मानं पहिल्याच दिवशी केली मोठी चूक, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूनं सांगितलं कारण?
IND vs AUS : तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पाऊस पडल्यानं वाया गेला. केवळ 13 ओव्हरचा खेळ होऊ शकला. दुसऱ्या दिवशी 98 ओव्हरचा खेळ होणार आहे.
ब्रिस्बेन : भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानं तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया गेला. पाऊस सुरु होण्यापूर्वी 13 ओव्हरचा खेळ झाला यामध्ये ऑस्ट्रेलियानं बिनबाद 28 धावा केल्या. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज अन् आकाशदीप यांना अपेक्षेप्रमाण यश मिळालं नाही. रोहित शर्माच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मॅथ्यू हेडननं भाष्य केलं आहे. रोहित शर्माचा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला असल्याचं मत त्यांनं व्यक्त केलं.
रोहित शर्माचं नेमकं काय चुकलं?
भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. मात्र, रोहित शर्माच्या निर्णयानं सर्वानं आश्चर्यचकित केलं. पहिल्या दिवसाचा खेळ पावसानं वाया गेला. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यानं रोहित शर्मानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानं भारत मॅचपूर्वी पहिल्यांदा पिछाडीवर गेला असल्याचं मत व्यक्त केलं.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडननं म्हटलं की, मी ऑस्ट्रेलियावर (मॅच जिंकण्यासाठी) दावा लावत आहे. मला वाटतं भारताच्या कॅप्टननं टॉस जिंकून चुकीचा पर्याय निवडला. गाबाची विकेट फलंदाजीसाठी चांगली आहे. सुरुवातीचे तीन दिवस फलंदाजीसाठी चांगले राहिले आहेत, असं हेडन म्हणाला.
हेडन म्हणाला, ही टेस्ट मॅच मालिका कोण जिंकणार याचा निकाल ठरवणार असल्याचं म्हटलं. सिडनी टेस्टमध्ये ते काही तरी करु शकतील. मात्र, गाबा आणि मेलबर्न मधील बॉक्सिंग डे कसोटी सर्वांना आवडते. अॅडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियानं विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी केली आहे. भारतानं पर्थमध्ये पहिली कसोटी 295 धावांनी जिंकली आहे.
हेडननं ब्रिस्बेन कसोटी सुरु होण्यापूर्वी भारतीय गोलंदाजांना सल्ला दिला होता की चौथ्या आणि पाचव्या स्टम्प लाइनला टार्गेट करावं. गाबाच्या पिचमधून मिळणाऱ्या उसळीचा फायदा घ्या. स्टार स्पोर्टससोबत बोलताना म्हटलं की भारताला जेव्हा गोलंदाजीची संधी मिळेल तेव्हा त्यांना चौथ्या आणि पाचव्या स्टम्पवर मारा करावा लागेल.
भारताला विजय आवश्यक
भारतानं ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी जिंकली. ती कसोटी पर्थमध्ये झाली होती. त्यानंतर दुसऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी कसोटी सामने जिंकावे लागतील.
इतर बातम्या :