World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी थरार, कधी कुठे पाहाल सामना?
ICC Cricket World Cup 2023 : रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महामुकाबला रंगणार आहे. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे.
ICC Cricket World Cup 2023 : रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महामुकाबला रंगणार आहे. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. रविवारी दुपारी दोन वाजता लढतीला सुरुवात होणार आहे. त्याआधी नाणेफेक होईल. विश्वचषक विजयाच्या दावेदार असणाऱ्या दोन संघातील लढतीकडे सर्व क्रीडा चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना सर्वांना मोफत पाहता येणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल.
फुकटात कुठे पाहाल सामना ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा शानदार सामना मोबईलवरही लाईव्ह पाहता येईल. डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल.
मोबाइलवर कुठे पाहाल सामना ?
डिज्नी प्लस हॉटस्टार विश्वचषकाचे सर्व सामने मोफत पाहता येतील. मोबाइलवर सामना पाहण्यासाठी फक्त तुम्हाला हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल.
रेडियोवर कुठे ऐकाल लाईव्ह कॉमेंट्री ?
विश्वचषकातील सामन्याचे लाई्ह कॉमेंट्री अथवा समालोचन ऐकायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रेडियोच्या डिजिटल चॅनल - इंडिया: प्रसार भारतीवर जावे लागेल. त्याशिवाय आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल ऑडियो पार्टनर डिजिटल 2 स्पोर्ट्स (Digital 2 Sports) वरही समालोचन ऐकू शकता.
विश्वचषकाच्या बातम्या कुठे वाचाल -
विश्वचषकाच्या बातम्या अथवा स्कोअरकार्ड पाहण्यासाठी तुम्हाला आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एबीपी माझाच्या https://marathi.abplive.com/ संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
वनडे फॉर्मेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत 70 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 33 सामन्यात विजय मिळवला आहे. पाच सामन्याचा निकाल लागला नाही. भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया आणि कांगारु यांच्यामध्ये आतापर्यंत 54 सामने झाले आहेत, त्यामध्ये भारतीय संघाला फक्त 14 सामन्यात विजय मिळला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 38 सामन्यात बाजी मारली आहे. दोन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. मायभूमीतही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
न्यूट्रल ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 25 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 सामन्यात बाजी मारली आहे. तीन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही.
आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 12 वेळा आमना सामना झाला आहे. त्यामध्ये भारताला फक्त चार सामन्यात विजय मिळाला, तर 8 सामन्यात कांगारुंनी बाजी मारली.
चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. येथेही ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. कांगारुंनी चेन्नईमध्ये दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त एक सामना जिंकता आला आहे.