(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया संघांतील वाद मिटला, क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार 15 ते 19 जानेवारी दरम्यान खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
IND Vs AUS : ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटीवरून टीम इंडियामधील वाद संपला आहे. अंतिम कसोटी वेळापत्रकानुसार होणार असून टीम इंडिया ब्रिसबेनमध्येच बॉर्डर -गावस्कर मालिकेचा चौथा कसोटी सामना खेळेल. 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
ब्रिस्बेनमधील क्वारंटाइनच्या कठोर नियमांमुळे भारतीय संघ नाराज होता. तसेच अंतिम कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्याची भारताची इच्छा नसल्याचं बोललं जात होतं. सिडनीतील कोरोनाची वाढती संख्य़ा लक्षात घेता क्वीन्सलँड राज्याने हे स्पष्ट केले होते की सिडनीहून ब्रिस्बेनला येणाऱ्याला कोरोनाचे कठोर प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे.
कोरोनाच्या संख्येत घसरण
खबरदारी म्हणून क्वीन्सलँड राज्याने सीमा बंद केल्या आहेत. परंतु कोरोनाच्या प्रोटोकॉलमध्येही भारतीय संघाच्या स्वागतासाठी क्वीन्सलँड सज्ज झालं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन सापडले होते. त्या दृष्टीने तेथे संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. हा तीन दिवसांचा हा लॉकडाऊन सोमवारी रात्री म्हणजे संपणार आहे.
सुरवातीला भारतीय संघाने क्वीन्सलँड शहरातील कठिण प्रोटोकॉल संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. परंतू आता हा लॉकडाऊन आज संपणार आहे. तसेच तेथील कोरोनाच्या संख्याही घट झाली आहे. त्यामुळे तेथील लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. याबाबत भारतीय संघ समाधानी आहे. भारतीय संघाने लेखी याबाबत लेखी हमी मागितल्या होत्या. आता भारत संपूर्ण प्रक्रियेवर समाधानी आहे. यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार 15 ते 19 जानेवारी दरम्यान खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची मालिका 1-1ने बरोबरीत आहे. या मालिकेचा तिसरा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवसाचा खेळ आज (सोमवारी) खेळला जात आहे.