एक्स्प्लोर

Ind Vs Aus : अॅडलेडमध्येही भारताचा पराभव, कांगारुंनी दोन विकेट्सनी दुसरा सामना जिंकला, वन डे मालिकाही खिशात 

India vs Australia : मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कोनोलीच्या दमदार खेळीने बाजी पलटली आणि भारताला दुसरा सामनाही गमवावा लागला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात (Adelaide Match) भारतावर दोन विकेट्सने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह भारताचा अॅडलेडमध्ये 17 वर्षांनंतरचा पहिला वनडे पराभव ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 22 चेंडू राखून आठ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केले. शुभमन गिलसाठी (Shubman Gill) ही पहिली वनडे मालिका होती ज्यात त्याला कर्णधार म्हणून पराभव पत्करावा लागला.

Adelaide Ind Vs Aus : शॉर्ट आणि कोनोलीच्या दमदार खेळीने बाजी पलटली

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. कर्णधार मिशेल मार्श 11 आणि ट्रॅव्हिस हेड 28 धावांवर माघारी परतले. त्या वेळी संघाचा स्कोअर फक्त 50 होता. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मॅथ्यू शॉर्टने मॅट रेनशॉसह 155 धावांची निर्णायक भागीदारी केली. शॉर्टने 78 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 74 धावा केल्या.

India vs Australia 2nd ODI : कोनोलीने मॅच विनिंग खेळी

रेनशॉ आणि अ‍ॅलेक्स केरी लवकर बाद झाल्याने कांगारूंची स्थिती पुन्हा डळमळली होती. 132 धावांवर चार विकेट्स गमावल्यावर भारताची पुनरागमनाची शक्यता वाढली, पण त्याच क्षणी युवा कूपर कोनोलीने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने केवळ 53 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला. त्याला मिचेल ओवेनची साथ मिळाली, त्याने फक्त 23 चेंडूत 36 धावा केल्या.

Team India : भारतीय फलंदाजांचे प्रयत्न अपुरे

भारताकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. रोहितने 97 चेंडूत 73 धावा, तर अय्यरने 77 चेंडूत 61 धावा केल्या. अखेरीस अक्षर पटेलने 41 चेंडूत 44 धावांची झुंज दिली आणि संघाचा स्कोअर 264 पर्यंत नेला. मात्र हा स्कोअर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर अपुरा ठरला.

Shubman Gill : जम्पा आणि बार्टलेटची प्रभावी गोलंदाजी

ऑस्ट्रेलियासाठी लेगस्पिनर अ‍ॅडम जम्पाने 60 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तर वेगवान गोलंदाज जेव्हियर बार्टलेटने 39 धावांत 3 बळी टिपले. बार्टलेटने विराट कोहलीला शून्यावर बाद करून भारताला धक्का दिला. भारताचे मधले फळे कोसळले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

मालिकेत भारताची निराशाजनक स्थिती

या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. तिसरा सामना औपचारिक ठरणार असून, भारतासाठी तो प्रतिष्ठेचा लढा असेल. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
IPL Playoffs Qualification Scenarios 2026: मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लोऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लोऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
Virat Kohli And Manish Pandey RCB vs KKR IPL 2026: अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
RCB vs KKR IPL 2026 : रायपूरमधील आयपीएलच्या इतिहासातला सर्वात मोठा 'रन चेज' आता आरसीबीच्या नावे! विराट कोहलीच्या 10व्या शतकाने KKRचा केला खेळ खल्लास
रायपूरमधील आयपीएलच्या इतिहासातला सर्वात मोठा 'रन चेज' आता आरसीबीच्या नावे! विराट कोहलीच्या 10व्या शतकाने KKRचा केला खेळ खल्लास

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Pune Hospital Bomb Case : हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
Ambernath Nagar Parishad: अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
Maharashtra Reservation Policy: स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
Monsoon Update : मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
Embed widget