Ind vs Aus 5th Test Day 2 : सिडनी कसोटी एका रोमांचक मोडवर, दुसऱ्या दिवशी पडल्या 15 विकेट! टीम इंडियाकडे 145 धावांची आघाडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे.

किरण महानवरLast Updated: 04 Jan 2025 12:40 PM

पार्श्वभूमी

Australia vs India 5th Test Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस (4 जानेवारी) अतिशय रोमांचक होता...More

Ind vs Aus 5th Test Day 2 : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताने ऑस्ट्रेलियावर घेतली 145 धावांची आघाडी

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 141 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे चार धावांची आघाडी होती. अशा स्थितीत भारतीय संघाची एकूण आघाडी 145 धावांची झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला.