Nashik News : नाशिकमध्ये (Nashik News) काही दिवसांमध्ये घरात लग्न सोहळा होणाऱ्या घरी दांपत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी हा टोकाचे पाऊल का उचलले याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ज्या घरी सनईचे सूर वाजणार होते. त्या घरामधून शव बाहेर पडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शाह कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शाह दाम्पत्याने विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
नाशिक शहरातील टिळकवाडी येथील राहणारे जयेश शहा व रक्षा शहा या दाम्पत्याने रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवत असताना जेवणातून विष सेवन करून आपले जीवन संपवले. दोघा मुलांसोबत रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर जय शहा यांनी आपल्या पत्नीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळच्या सुमारास शहा दांपत्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संपूर्ण परिवारात लग्नाची लगबग होती सुरू
जय शहा व रक्षा शहा यांच्या मुलाचा विवाह अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला होता. 26 जानेवारी रोजी जयेश शहा यांच्या मुलाचा विवाह ठरला आणि संपूर्ण परिवारात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र दोघा मुलांसोबत राहणारे जयेश शहा यांनी रविवारी रात्री मुलांसोबत जेवणानंतर व्यावसायिक पतिने आपल्या पत्नीसह विष सेवन करून आत्महत्या केल्याने संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच शहा हे जैन समाजातील अतिशय नामवंत असल्याने संपूर्ण जैन समाजात देखील शहा यांच्या या घटनेला हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी घडलेल्या घटनास्थळी जाऊन तपास केला असता कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. शहा पती-पत्नीने आपले जीवन का संपवले? याच कारण अद्याप अस्पष्ट आहे, या संदर्भात नाशिक पोलीस तपास करत आहे.
दोन मुलांसोबत जेवण केले अन्...
रविवारी रात्री शहा यांनी आपल्या दोन मुलांसोबत जेवण केले आणि त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. तासाभरानंतर रक्षा शाह यांनी आपला मोठा मुलगा कौशल यास फोन केला फोनवर त्या तुटक आणि अडखळत घाबरलेल्या स्थितीत बोलत असल्याचं कौशलच्या लक्षात आल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. फोन ठेवताच मुलाने धाव घेऊन खोलीत दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना लागलीच जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती खालवल्याने दोघांनाही नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटेच्या दरम्यान या दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास सुरू
नाशिक पोलिसांनी शहादांपत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळून आले संशयास्पद कोणतीही वस्तू अथवा आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आलेली नाही नाशिक पोलिसांनी चौकशी केली मात्र अद्याप आत्महत्येचा कारण पोलिसांना समजू शकले नाहीत. अवघ्या वीस दिवसांवर आपल्या मुलाचा विवाह असताना या शहादांपत्याने नेमकी आत्महत्या का केली या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. व्यावसायिक असलेले जयेश शहा यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावर कुटुंबीय देखील संभ्रमात आहे. व्यवसायात देखील काही अडचण होती का या संदर्भात आता पोलीस तपास करत आहे. मात्र प्रतिष्ठित आणि व्यावसायिक असलेले जयेश शहा आणि रक्षा शहा यांच्या आत्महत्येने पोलीस तपासात नेमकं काय समोरीत हे बघ ना आता महत्त्वाचं असणार आहे.