अमरावती : मी भाषणात वारंवार म्हणतोय हिंदू शेतकरी, हिंदू मेंढपाळ. मी हे का बोलतोय कारण धर्माच्या नावाने काहीजण राजकारण करताय. एकीकडे शेतकरी मरतोय, दुसरीकडे मेंढपाळ मरतोय. राज्यात बगर मेहनतीच्या योजना सुरू केल्या. मात्र ज्यांना डोळे नाही, पाय नाही त्यांना चार महिन्यापासून पगार नाही. त्यामुळे अजितदादा कुठं गेला तुमचा वादा. अशा म्हणण्याची वेळ आली आहे. आज फक्त इशारा आहे. कायदा मोडून हात लावला तर उद्या हातात कायदा घेतल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी अमरावतीतील 'वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे. अमरावतीत शेतकरी, मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलन सभेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारवर निशाणा साधला आहे.


हम रुकने वाली नही, चलने वाली औलाद है- बच्चू कडू


चारा आहे पण हात लावू देणार नाही हा कसला कायदा आहे. बटेंगे को कंटेंगे म्हणताय, तर मग मेंढपाळ पण कटणार ना? आता जर कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही, कृषिमंत्री म्हणाले की आर्थिक परिस्थिती चंगली नाही.  त्यामुळे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही. मग बोंबले कशाला. जेवायला बोलवायचं आणि पळून जायचं. मात्र हम रुकने वाले औलाद नही, चलने वाले औलाद है, न्याय हक्कासाठी मेलो तरी चालेल. असा निर्धारही  बच्चू कडूंनी यावेळी बोलताना केला आहे.  


आज आम्ही शांततेत आहोत, ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा. आम्ही शांततेतच आंदोलन करणार आहोत. जो आमच्यात आडवं येईल त्याला दाखवू. पुढच्या वेळीस इथं आल्यावर पुन्हा जाणार नाही. मी विभागीय कार्यालयात आत जाऊन येतो, जर ऐकलं तर ठीक नाहीतर आत घुसू. असा इशाराही बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी अमरावतीतील 'वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे.


पराभूत झाल्यानंतर बच्चू कडूंचं पहिलं मोठं आंदोलन


शेतमालाचा भाव, पीक कर्ज, मेंढपाळांना न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय. आंदोलनाची सुरुवात पंचवटी चौकातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरवरून दर्शन घेऊन मोर्चा निघाला. मोर्चा पंचवटी चौक वरून गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून थेट विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकनार.


काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळ यांच्या काही मागण्यांसंदर्भात अल्टीमेटम दिला होता. मात्र, शासनाने दोघांच्याही मागण्यांकडे पाठ फिरवल्याने अखेर शेतकरी आणि मेंढपाळ यांना सोबत घेऊन बच्चू कडू हे अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर "वाडा आंदोलन" करणार आहेत. राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत.


शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, वण्यप्राण्यांपासून त्याच्या पिकाचे संरक्षण झाले पाहीजे, त्याला पीक नुकसानीचे पिक विम्याव्दारे भरपाई मिळणे गरजेचे आहे, राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात घोषीत केलेली सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, अश्या अनेक मागण्या यावेळी वाडा आंदोलनातून करण्यात येत आहे.


हे ही वाचा