एक्स्प्लोर

मैच

IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | दुसऱ्या कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी विजय

IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. फलंदाजीत सरस कामगिरी करणाऱ्या भारताने गोलंदाजीतही कमाल केली.

LIVE

IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | दुसऱ्या कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी विजय

Background

मेलबर्न : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. पण टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे सध्या दोन धावांची आघाडी असून चार विकेट्स हातात आहेत.

 

दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे 112 धावांवर बाद झाला. त्यानंतर 57 धावा करुन रवींद्र जडेजाही माघारी परतला. मग भारताचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला. परिणामी टीम इंडियाने 131 धावांची आघाडी घेतली.

 

यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची घसरगुंडी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे दाणादाण उडवत सहा विकेट्सही मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. तिसरा दिवस संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. कॅमरुन ग्रीन 17 धावा आणि पॅट कमिन्स 15 धावा करुन नाबाद आहेत.

 

आता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच सामना संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. तर अर्धशतकी खेळ करणाऱ्या रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने दोन विकेट्स घेतल्या.

 

पहिला सामन्यातील लाजिरवाणा पराभव आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फेव्हरेट समजलं जात होतं. होतं. परंतु टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केलं आहे. ज्या पीचवर टीम इंडियाने 300 पेक्षा धावा केल्या, त्यावर ऑस्ट्रेलिया एका फलंदाजाला अर्धशतकही करता आलेलं नाही.

 

प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

 

ऑस्ट्रेलियन संघ : जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॉथन लिएन, जोश हेजलवुड.

07:44 AM (IST)  •  29 Dec 2020

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांवर आटोपला असून भारतासमोर विजयासाठी 70 धावांचं आव्हान आहे. हा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी भारताकडे आहे.
08:32 AM (IST)  •  29 Dec 2020

बॉक्सिंग डे कसोटीत 70 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल पाच धावांवर बाद झाला आहे.
08:40 AM (IST)  •  29 Dec 2020

भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा तीन धावा करुन माघारी
06:43 AM (IST)  •  29 Dec 2020

भारताने विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कॅमरुन ग्रीनची विकेट मिळवण्यात मोहम्मद सिराजला यश आलं आहे. कॅमरुन ग्रीन 45 धावा करुन बाद झाला.ऑस्ट्रेलियाचे आठ फलंदाज माघारी परतले असून एकूण आघाडी 50 धावांची आहे.
06:24 AM (IST)  •  29 Dec 2020

दुसरीकडे कॅमरुन ग्रीन खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. कसोटी क्रिकेटमधील अर्धशतक झळकावण्यासाठी त्याला अवघ्या 9 धावांची गरज आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने एकूण 40 धावांची आघाडी घेतली आहे.
06:22 AM (IST)  •  29 Dec 2020

103 चेंडूत 22 धावा केल्यानंतर पॅट कमिन्स जसप्रीत बुमराच्या बाऊन्सरचा बळी ठरला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या तासात कमिन्सने ग्रीनच्या साथीने भारतीय गोलंदाजांचा योग्यरित्या सामना केला. परंचु बुमराच्या शॉर्ट पिच बॉलचा अंदाज न आल्याने कमिन्स झेलबाद झाला. सातव्या विकेटसाठी दोघांनी 57 धावांची भागीदारी रचली होती.
13:14 PM (IST)  •  28 Dec 2020

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. टीम इंडियाला पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे सहा विकेट्सही मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. पण टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे.
07:06 AM (IST)  •  28 Dec 2020

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने बॉक्सिंग डे कसोटीत आपली पकड मजबूत केली आहे आहे. भारताचा पहिला डावा 326 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाला 131 धावांची आघाडी मिळवण्यात यश आलं आहे. उपाहारानंतर ऑस्ट्रेलिया आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करेल.
06:16 AM (IST)  •  28 Dec 2020

बॉक्सिंग डे कसोटीत भारताने पहिल्या डावात 300 धावांच्या टप्पा पार केला आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठं यश मिळालं आहे. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा माघारी परतले आहेत. अजिंक्य रहाणे 112 धावांवर रन आऊट झाला. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पंधरावं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जडेजा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर 57 धावा करुन बाद झाला. जडेजा आणि रहाणे यांनी सहाव्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचली होती.
12:12 PM (IST)  •  27 Dec 2020

अजिंक्य रहाणेचे शानदार शतक, टीम इंडियाची मोठ्या आघाडीकडे वाटचाल, रहाणे जाडेजाची चांगली साथ, टीम इंडियाच्या 5 बाद 268 धावा
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dharashiv  Lok Sabha Elections 2024 : प्रवीण परदेशी कमळ चिन्हावर लढण्यास आग्रही : ABP MajhaRavikant Tupkar  Lok Sabha  : शंभर टक्के विजय शेतकऱ्यांच्या मुलांचा होणार : रविकांत तुपकरIncome Tax  Notices Congress Party : काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस : ABP MajhaShiv Sena Lok Sabha Candidates: शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
Embed widget