Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून KL राहुलला डच्चू? रोहित शर्माच्या एन्ट्रीने टीम इंडियाचे कॉम्बिनेशन बदलले, जाणून घ्या प्लेइंग-11
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. पर्थमधील पहिलाच सामना जिंकून भारतीय संघाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला...
Australia vs India 2nd Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. पर्थमधील पहिलाच सामना जिंकून भारतीय संघाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. दुसरा सामना अजून बाकी असला तरी भारताला पीएम XI सोबत सराव सामना खेळायचा आहे. यानंतरही दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळतील हे जवळपास निश्चित दिसत आहे.
रोहित शर्मा टीम इंडियात कर्णधार म्हणून करणार पुनरागमन
जसप्रीत बुमराह भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत कर्णधार होता, पण आता रोहित शर्मा तिथे पोहोचला आहे आणि तोही संघात सामील झाला आहे. म्हणजेच रोहित शर्मा पुढचा सामना खेळताना दिसणार आहे. पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वालने केएल राहुलसोबत डावाची सुरुवात केली होती. पहिल्या डावात राहुलची बॅट चालली नाही, पण दुसऱ्या डावात त्याने शानदार फलंदाजी केली आणि जैस्वालच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावा जोडल्या. याच भागीदारीमुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. (Ind vs Aus 2nd Test Adelaide Team India Playing-11)
रोहित आणि यशस्वी देणार सलामी, KL राहूलला डच्चू?
रोहित शर्माच्या आगमनाने आणि यशस्वी जैस्वालसह सलामी केल्याने केएल राहुल पुढील सामन्यासाठी संघाबाहेर असेल का? कदाचित तसे होणार नाही. राहुललाही माहीत आहे की, रोहित परतल्यावर तो ओपन करू शकणार नाही. पण तो खालच्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत बाहेर कोणाला राहावे लागले तर तो ध्रुव जुरेल असेल. ध्रुव जुरेलला गेल्या सामन्यात काही विशेष कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या, तेव्हा ध्रुवने 11 धावा केल्या, आणि दुसऱ्या डावातही ध्रुव केवळ एक धाव करू शकला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना 6 डिसेंबरपासून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे तो इतर सामन्यांपेक्षा वेगळा असेल. कारण तो लाल चेंडूने खेळला जाणार नाही, तर गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत खेळलेल्या गुलाबी चेंडूच्या सर्व कसोटी जिंकल्या आहेत. म्हणजेच भारतीय संघाची खरी कसोटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील या सामन्यात असेल. यासाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. संघाचा खेळ कसा होतो हे पाहणे बाकी आहे.