IND vs AUS, Pitch Report : नागपूरमध्ये रंगणार पहिला कसोटी सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या, पिच रिपोर्ट सविस्तर
IND vs AUS : भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात कसोटी मालिकेतील सलामीचा सामना उद्या म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून खेळवला जात आहे. चान सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकणार आहे. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही मालिकाही महत्त्वाची आहे. तर आजच्या या महत्त्वाच्या सामना होणाऱ्या मैदानाची खेळपट्टी अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ...
नागपूरच्या या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवरील (VCA) स्टेडियममधील खेळपट्ट्यांनी वेगवान गोलंदाजांना आजवर मदत केली आहे, पण सोबतच भारताती बहुतेक विकेट्सप्रमाणे फिरकीपटूंना ही येथे मदत मिळते. फलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला धावा काढणं थोडं सोपं वाटलं होते, पण मैदानावरील प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये अर्थात कसोटीमध्ये सामन्यावर वर्चस्व दाखविण्यासाठी फलंदाजांना फार मेहनत घ्यावी लागते. तसंच या मैदानावरील शेवटच्या कसोटीला बऱ्यापैकी काळ उलटला आहे, त्यामुळे आता बऱ्याच दिवसांनी एक रंगतदार लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान नागपुरात सरावासाठी मागील काही दिवसांपासून टीम इंडिया घाम गाळत असून बीसीसीआय सोशल मीडियावर खेळाडूंचे फोटो पोस्ट करत आहे.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसा आहे भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 120 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 30 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :