IND vs AUS : कांगारुचे हेजलवुड-स्टार्क तर टीम इंडियाचे बुमराह-पंत संघाबाहेर; जाणून घ्या कोणता संघ मजबूत
Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदज जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. तर टीम इंडिया ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय मैदानावर उतरणार आहे. अशात पहिल्या कसोटी सामन्यात कोणता संघ मजबूत आहे, याची चर्चा रंगली आहे. पाहूयात सविस्तार....
हेजलवूड-स्टार्कची कमी भासणार?
हेजलवूड आणि स्टार्क हे ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे गोलंदाज आहेत. त्यांना भारतामध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. दोन्ही खेळाडू संघाबाहेर असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. पण ऑस्ट्रेलियाकडे या दोन्ही गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलेंड यासारखे दर्जेदार गोलंदाज आहेत. ते हेजलवूड आणि स्टार्क यांची कमी जाणवू देणार नाहीत. तिसरा गोलंदाज म्हणून लान्स मॉरिस हाही खेळू शकतो. पण नागपूरमधील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. अशात ऑस्ट्रेलियाचा संघ प्लेईंग 11 मध्ये तीन फिरकी गोलंदाजांना संधी देईल, असं वाटतेय. जर असं झालं तर हेजलवूड आणि स्टार्क यांची कमी ऑस्ट्रेलियाला भासणार नाही. नॅथन लियोन आणि एश्टन अगर नागपूरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासाठी तुरूप का इक्का ठरू शकतात...
भारतीय संघाकडे पर्यायांचा भडीमार -
जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर संघात नसणे हा टीम इंडियासाठी मोठा झटका आहे. अय्यरने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. तर पंत आणि बुमराहने एकहाती सामने जिंकून दिलेत. हे खेळाडू नसणे भारतासाठी मोठा झटका आहे, पण त्यांचे पर्याय उपलब्ध आहे. सूर्यकुमार यादव अथवा इशान किशन ऋषभ पंतची कमी पूर्ण करु शकतो... तर श्रेयस अय्यरच्या जागी शुभमन गिल याला संघात स्थान मिळू शकते. गोलंदाजीचा वितार करता मोहम्मद सिराज आण मोहम्मद शामी सध्या पूर्ण लयीत आहेत. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन ही जोडी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरोधात धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे.
कोणता संघ मजबूत ?
दोन्ही संघातील अनुभवी आणि महत्वाचे खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर आहेत. पण त्यांच्याशिवायही दोन्ही संघ मजबूत दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या तुलनेत सध्या तुफान फॉर्मात आहे. गेल्या काही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने एकतर्फी विजय मिळवले आहेत. तर दुसरीकडे मागील काही कसोटी सामन्यात भारतीय संघ बेरंग दिसला होता. पण मायदेशात खेळत असल्यामुळे भारताला त्याचा फायदा मिळू शकतो. मायदेशात भारतीय संघाला पराभूत करणं... शक्य नाही. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे... गेल्या काही वर्षांपासून भारताने बॉर्डर गावसकर चषकावर नाव कोरलेय.