एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs AUS 1st T20 Result : ऑस्ट्रेलियाने 209 धावांचं लक्ष्य गाठत भारताला 4 विकेट्सनी नमवलं, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs AUS, Match Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने धमाकेदार बॅटिंग करत जिंकला आहे.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारत 4 विकेट्सनी पराभूत झाला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत कांगारुनी प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने केएल राहुल, हार्दीक यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले. पण ऑस्ट्रेलियानेही सुरुवातीपासून कमाल फलंदाजी केली. कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक आणि वेड-स्मिथच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सनी सामना जिंकला. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs AUS 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला आहे.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने आधी 208 धावा केल्या. ज्यामुळे विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 209 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाने कमाल फलंदाजी करत हे लक्ष्य 4 चेंडू आणि 4 विकेट्स राखून पूर्ण केलं.
- सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी घेतली.
- कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले.
- पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला.
- त्यानंतर हार्दीक पंड्या क्रिजवर आल्यावर त्यानेही चांगली फलंदाजी केली. पण तोवर सूर्यकुमारही 46 धावा करुन बाद झाला.
- अखेर हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले.
- ऑस्ट्रेलियाचा संघ 209 धावांचं मोठं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आला असता त्यांची सुरुवातही चांगली झाली. पण 39 धावांवर आरॉन फिंच (22) बाद झाला. पण त्यानंतर कॅमरुननं स्मिथसोबत धडाकेबाज फलंदाजी सुरु ठेवली.
- आपलं पहिलं वहिलं आतंरराष्ट्रीय टी20 अर्धशतक झळकावत ग्रीनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. 61 धावा करुन तो बाद झाला, स्मिथही 35 धावा करुन बाद झाला.
- पण मॅथ्यू वेडने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
भविष्य
Advertisement