(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत कोहलीची जागा कोण घेणार? 'हे' तिघे आहेत बेस्ट ऑप्शन
India vs New zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेत विराट, रोहित अशा दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे.
Team India : भारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Team India tour of New Zealand) असून आधी 3 टी-20 सामन्यांनंतर 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार असून काही युवांना संधी देण्यात आली आहे. तसंच संजू, श्रेयस सारखे काही खेळाडू संघात पुनरागमन देखील करत आहेत. विराट, रोहित अशा दिग्गजांना विश्रांती देण्यात आली असून त्यामुळेच इनफॉर्म विराटची जागा नक्की कोण घेईल? अशी चर्चा रंगली आहे. तर यासाठी तीन ऑप्शन या संघात आहेत ते कोणते पाहूया...
तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याची जागा घेण्यासाठी संजू सॅमसन (Sanju Samson) हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. तसंच सॅमसनशिवाय श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. हे तिन्ही खेळाडू विराट कोहलीच्या क्रमांक तीनची पोकळी भरून काढू शकतात. अलीकडेच संजू सॅमसनने न्यूझीलंड 'अ' विरुद्धच्या वनडे मालिकेत शानदार फलंदाजी केली. ज्यामुळे मालिकेत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला संजू सॅमसन. त्यामुळे संजू विराटची जागा भरुन काढू शकतो पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो हे पाहावं लागणार आहे.
संजूशिवाय विचार केल्यास न्यूझीलंड दौऱ्यावर श्रेयस अय्यर क्रमांक हा देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तीन अर्धशतक ठोकली होती. त्यामुळे श्रेयस अय्यर हा तीन नंबरवर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर टी20 विश्वचषकात संघाचा भाग असणारा दीपक हुडा हा देखील संघ व्यवस्थापनासाठी एक तगडा पर्याय असू शकतो. दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावलं होतं. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन दीपक हुडाला देखील विराटच्या जागी संधी देऊ शकतो.
टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
हे देखील वाचा-