(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 Playoff : केएलच्या 79 धावांच्या खेळीनंतरही त्याच्यावर टीकांचा वर्षाव, कुठे चूकला राहुल?
IPL 2022 : बंगळुरु संघाने लखनौला 14 धावांनी मात दिल्यामुळे लखनौ संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
RCB vs LSG, IPL 2022 : बुधवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौचा 14 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे लखनौचं स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलं. दरम्यान सामन्यात लखनौकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 79 रन केले, पण तरीही पराभवामागील मोठं कारण म्हणून केएलकडे पाहिलं जात आहे, ते म्हणजे त्याचा खेळीदरम्यानचा स्लो स्ट्राईक रेट...
'मोठं टार्गेट असतानाही धिमी सुरुवात'
रजत पाटीदारच्या शतकाच्या जोरावर आरसीबीने लखनौसमोर 208 धावांचे तगडे आव्हान ठेवले. ज्याचा पाठलाग करायला मैदानात आलेल्या लखनौच्या सलामीवीरांपैकी डि कॉक तर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार केएलने देखील धिम्यागतीने सुरुवात केली. इतक मोठं लक्ष्य असतानाही राहुलला 50 धावा करण्यासाठी तब्बल 43 चेंडू खेळावे लागले. अर्धशतक झाल्यानंतर राहुलने स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले, पण तोवर निर्धारीत रनरेट बराच वाढला होता. राहुल बाद झाला तोवर त्याने 136.21 च्या स्ट्राईक रेटने 58 चेंडूवर 79 रन केले होते. राहुलने यंदाच्या हंगामात 15 सामन्यात 616 रन केले आहेत.
असा पार पडला सामना
नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला.
हे देखील वाचा-