IND vs SA 3rd T20 : तिसऱ्या टी20 सामन्यासापूर्वी जाणून घ्या पिचची स्थिती, मैदानावरील रेकॉर्ड्स
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात पराभवानंतर भारतीय संघ आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.
IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा टी20 सामना विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारत पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.
सामना पार पडणाऱ्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत चांगली असल्याने नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मैदानावर सर्वाधिक स्कोर 127 आणि सर्वात कमी 82 रन इतका आहे.
कशी आहे मैदानाची स्थिती?
डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमरील खेळपट्टी गोलंदाजासाठी अधिक चांगली आहे. याआधीही याठिकाणी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे फलंदाजांना रिस्क अधिक असल्याने सांभाळून खेळावं लागेल. यावेळी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने सामना संपूर्ण षटकांचा होईल. त्यात समुद्रकिनारा जवळ असल्याने हवा अधिक असल्यास गोलंदाजांना अधिक मदत होईल.
कशी असू शकते भारताची अंतिम 11
ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल,अर्शदीप सिंह/उमरान मलिक.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आठ सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. आता देखील मालिकेतील पहिले दोन सामने आफ्रिकेने जिंकत मालिकेत वर्चस्व मिळवलं आहे.
- IND vs SA: मॅच बघायला जाताय की हाणामारी करायला? सामनादरम्यानचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ एकदा बघाच!
- कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण? फक्त सात जणांनाचं गाठता आलाय विक्रमी टप्पा
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातच चहलकडे विक्रम करण्याची संधी; घ्याव्या लागतील फक्त 3 विकेट्स