IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पहिला टी20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारताचं कर्णधारपद केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋषभ पंतकडे गेलं आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. तर या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.

  


कशी आहे मैदानाची स्थिती


दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधअये आज सामना होणार असून या ठिकाणचा पिच धीम्या गतीचा आहे. पण बाउंड्री अधिक मोठी नसल्याने आणि आउटफील्ड फास्ट असल्याने मोठी धावसंख्या देखील उभी राहू शकते. त्यामुळे फलंदाजीसाठी आधी उतरनारा संघ 170 हून अधिक धावसंख्या उभारु शकतो. त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक अवघड पडू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेणं पसंद करेल. या पिचवर फिरकीपटूंना अधिक मदत मिळाल्याचं दिसून आलं आहे. 


कशी आहे हवामानाची स्थिती?


पहिल्या टी20 सामन्यादरम्यान हवामानाच्या स्थितीचा विचार करता गुरुवारी दिल्लीचं तापमान 43 ते 32 अंश डिग्री सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. हवामान वेबसाईट  accuweather च्या रिपोर्टनुसार सामन्यादरम्यान आभाळ साफ राहू शकतं. पण उकाड्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता अजिबात नसल्याचंही सांगितलं जात आहे. 


आतापर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका  


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. 



हे देखील वाचा-