India vs South africa Live : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात असून हे सर्व सामने भारतीय भूमीत खेळवले जाणार आहेत. सामन्यांना आजपासून दिल्लीच्या मैदानात सुरुवात होणार असून संघाचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे असणार आहे. केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर पंतकडे ही जबाबदारी गेली असून हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


आज 9 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि दक्षिण आफ्रिका हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.  


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. 



हे देखील वाचा-