India vs South africa Live : ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ पहिला टी20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीच्या मैदानावर कसून सरावानंतर आता अंतिम 11 मध्ये नेमकी कोणा-कोणाला संधी मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने अनेक युवांना संधी देत, कार्तिक, पांड्या सारख्या दिग्गजांचं संघात पुनरागमन केलं आहे. पण यामध्ये अंतिम 11 कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नाणेफेकीनंतरच ही गोष्ट स्पष्ट होणार असेल तरी संभाव्य अंतिम 11 कोणती हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कशी असू शकते भारताची भारताची अंतिम 11?
ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक/वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.
हे देखील वाचा-
- मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यांपूर्वी कर्णधार केएल राहुल मालिकेबाहेर, कुलदीपलाही दुखापत
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातच चहलकडे विक्रम करण्याची संधी; घ्याव्या लागतील फक्त 3 विकेट्स
- तब्बल 23 वर्षे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवून मितालीचा क्रिकेटला अलविदा; तिचे काही रेकॉर्ड तोडणं म्हणजे अगदी अशक्य