India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी20 सामने उद्यापासून (9 जून) खेळवले जातील. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारताने आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीनुसारच संधी दिली गेली आहे. यावेळी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) देखील संधी मिळाली असून या सामन्यांवेळी तो एक नवा रेकॉर्ड करु शकतो. ज्यामुळे अनुभवी रवीचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) यालाही तो मागे टाकू शकतो.
दक्षिण आफ्रीका (south africa) संघाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात चहल टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणार खेळाडू बनू शकतो. कारण चहलने आतापर्यंत 242 टी20 सामन्यात 274 विकेट्स घेतले आहेत. तर आश्विननेन 282 टी20 सामन्यात 276 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे केवळ 3 विकेट्स घेताच चहल आश्विनला मागे टाकून सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारा भारतीय बनू शकतो. विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 54 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 68 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात त्याने 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |