India vs South Africa, T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्याला आता केवळ एक दिवस शिल्लक आहे. 9 जून रोजी हा पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण त्यापूर्वीच संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. केएल राहुलसोबत कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यालाही दुखापत झाल्यामुळे तोही सामन्यांना मुकणार आहे. दरम्यान राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला (Rishabh Pant) कर्णधारपद सोपवलं जाणार असून हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. बीसीसीआयने (BCCI) याबाबतची माहिती दिली आहे.

नुकतीच आयपीएल संपली असून आता भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात टी20 मालिका सुरु होत आहे. खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीवर भारतीय संघाची निवड झाली. यावेळी केएल राहुलला (KL Rahul) कर्णधारपद सोपवण्यात आलं पण आता तो दुखापतग्रस्त झाल्याने पंतकडे ही जबाबदारी गेली आहे. तर स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघात परतला आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी20 संघात (Team India squad) पहिल्यांदाच संधी मिळाली असून  विराट, रोहित, बुमराहसारखे दिग्गज विश्रांतीवर असणार आहेत.

कसा आहे भारतीय संघ?

ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

दुखापतग्रस्त - केएल राहुल, कुलदीप यादव

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 9 जून अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी20 सामना 12 जून बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी20 सामना 14 जून डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी20 सामना 17 जून सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी20 सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु