IND vs NZ, Weather Reoport : दुसऱ्या टी20 मध्येही पाऊस व्यत्यय आणणार का? वाचा कशी असेल हवामनाची स्थिती?
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरु टी20 मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
India vs New Zealand, 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असून 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू झालेल्या मालिकेत अजून एकही सामना खेळवला गेलेला नाही. कारण मालिकेतील पहिलाच सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. ज्यानंतर आज दुसरा टी20 सामना असणाऱ्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात देखील पावसाची शक्यता असल्याने सामन्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट आलं आहे. तर सामना होणाऱ्या ठिकाणचं नेमकं हवामान कसं असेल ते जाणून घेऊया...
हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार माऊंट मॉन्गनुई येथे आज 90 टक्के पावसाची शक्यता आहे. तसंच 24 किमी वेगाने वारे वाहू शकतात. पाऊस आणि हवामानातील आर्द्रता यामुळे तापमानही 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. त्यामुळे सामन्यावेळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. सामना होणाऱ्या बे ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे येथे फलंदाजांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. सामन्याच्या दुसऱ्या भागाच वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.
कधी, कुठे पाहल सामना?
भारतीय वेळेनुसार हा भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना आज दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head रेकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामन्यात विजय मिळवता आलाय. याशिवाय, एक सामना पावसामुळं रद्द झालाय.
टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
हे देखील वाचा-