कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने उत्तम आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर 345 धावांचा डोंगर उभा राहिला आहे.  यामध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) शतकासह शुभमन गिल आणि रवींद्र जाडेजाच्या अर्धशतकांचं महत्त्वाचं योगदान ठरलं आहे. सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला, ज्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Ayer) अनुभवी रवींद्र जाडेजासह भारताचा डाव सावरत एक शतकी भागिदारी रचली. पहिल्या दिवसखेर अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत होते.


ज्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच जाडेजा बाद झाला. पण अय्यरने त्याचं शतक पूर्ण केलं. पण 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मजदतीने 105 धावा करुन अय्यरही बाद झाला. दुसऱ्या दिवशी टीम साऊदीच्या भेद गोलंदाजीमुळे एक-एक भारतीय तंबूत परतत होते. पण त्याचवेळी अनुभवी रवींचंद्रन आश्विनने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ज्याला उमेश यादवने 34 चेंडूत 10 धावांची संयमी साथ देत भारताला 345 पर्यंत पोहचवलं. पण आश्विन बाद होताच इशांत शर्माही लगेचच तंबूत परतला आणि भारताला पहिला डाव 345 धावांवर आटोपला.



जेमिसन-साऊदीचा हल्ला


न्यूझीलंडकडून अनुभवी टीम साऊदीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 27.4 ओव्हरमध्ये 69 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर जेमिसन याने 3 आणि अजाज पटेलने 2 विकेट घेतल्या. यावेळी साऊदीने सर्वात कमी म्हणजेच 2.50 च्या इकोनॉमीने गोलंदाजी केल्यामुळे भारताच्या फलंदाजीला काहीसा लगाम लागला. अन्यथा भारतीय फलंदाजांचा फॉर्म पाहता 400 चा आकडा सहज पार झाला असता. 


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha