Team India : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना केवळ हलाल मांस खाणं अनिवार्य केल्याच्या कथित वृत्तानं सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झालीय. कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयनं टीम इंडियासाठी डाएट प्लान दिलं आहे आणि त्यात हलाल मांस अनिवार्य करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. केवळ हलाल मांस अनिवार्य करण्यात आल्यानं सोशल मीडियामध्ये चाहत्यांनी बीसीसीआयवर टीकेची झोड उठवलीय. हिंदू आणि शीख लोक झटका मांस खातात, तर मुस्लिम लोक हलाल मांस खाणं पसंत करतात. त्यामुळे भारत मुस्लिम देश आहे का? असा सवाल सोशल मीडियातून विचारण्यात आलाय. यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) स्पष्टीकरण दिलेय. अशाप्रकारचा कोणताही डायट प्लॅन खेळाडूंसाठी तयार केलं नसल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयने दिलं आहे. 


मंगळावारी रात्रीपासून ट्वीटरवर #BCCI Promotes Halal हा हॅश टॅग ट्रेंड करत आहे. यावरुन बीसीसीआयवर टीकेची झोड उडत आहे. यावर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं एबीपी न्यूजला स्पष्टीकरण दिलं आहे. एबीपीशी बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाले की, “खेळाडूंच्या डायट प्लॅनबाबतचं कोणतेही सर्कुलर बोर्डाकडून जारी करण्यात आलेलं नाही. शाकाहारी, मांसाहारी अथवा हलाल मांस खायचं की नाही, ही त्यांची वयक्तिक पसंद आहे. बोर्डाकडून याबाबतच्या कोणताही सूचना जारी केलेल्या नाहीत.“






पहिल्या कसोटीसाठी कानपूरमध्ये पोहचले संघ –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवारपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि भारत दोन्ही संघ कानपूरमध्ये पोहचले आहेत. दोन्ही संघांनी सराव सुरु केलाय. 


खेळाडूंच्या खाण्याचा मॅन्यू व्हायरल –
सोशल मीडियावर #BCCI_Promotes_Halal ट्रेंड होत आहे, ज्यातून भारतीय क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले जात आहेत. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी नवीन डाएट प्लान तयार केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. खेळाडूंना या डायटचं काटेकोरपणे पालन करावे लागणार असून खेळाडूंनी केवळ हलाल मांस खावं असं यात म्हटलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. टि्वटर वर #BCCI_Promotes_Halal ट्रेंड होत आहे, ज्यातून भारतीय क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले जात आहेत. वास्तविक बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन डाएट प्लान तयार केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. क्रिकेटपटूंना या योजनेचं काटेकोरपणे पालन करावे लागणार असून खेळाडूंनी केवळ हलाल मांस खावं असं यात म्हटलं होतं.